Bacchu Kadu Esakal
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu: सचिन तेंडूलकर यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू अन् कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

अंकिता खाणे (Ankita Khane)

सचिन तेंडुलकरच्या ऑनलाइन गेमच्या जाहीरातीवरुन पुन्हा एकदा माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. सचिन तेंडुलकरच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर बच्चू कडूंसह त्यांचे कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहोचले आहेत. सचिन तेंडुलकरने ऑनलाइन गेमची जाहीरात करु नये, असं बच्चू कडू यांनी म्हंटलं आहे. आंदोलनासाठी आलेल्या बच्चू कडू यांना पोलिसांनी रोखलं आहे.

आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकर यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जुगरची जाहिरात करू नये अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जर सचिन तेंडुलकर यांच्याकडे भारतरत्न नसता तर आम्ही आंदोलन केलं नसतं असंही बच्चू कडू यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

सचिनने ऑनलाईन जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीतर त्यांचा घरासमोर आंदोलन करु, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. बच्चू कडू यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र दिलं होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आज बच्चू कडू यांनी आंदोलन केलं आहे. घटनास्थळावरून बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


भारतरत्न सचिन तेंडुलकर हे ऑनलाईन गेमबाबतची जाहिरात करतात. त्यामुळे युवा पिढी अशा खेळांकडे आकर्षित होते. पैशासाठी अशी जाहिरात करणे योग्य नाही. त्यांनी अशा जाहिराती करु नये अशी आम्ही त्यांना यापूर्वी विनंती केली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे युवा वर्ग प्रभावित होतो, असंही कडू यांनी स्पष्ट केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT