Bachchu Kadu Esakal
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu: 'धर्म धोक्यात येत नसतो, धोक्यात येतो तो नेता!’ बच्चु कडू यांचं विधान चर्चेत

मी 15 वर्ष मेहनत केली. दिव्यांगांसाठी काम केलं. 150 गुन्हे दाखल करून घेतले

सकाळ डिजिटल टीम

राज्यात एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंड केल्यानंतर 50 खोके एकदम ओके अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली. त्यानंतर आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातही याच वाक्यावरून चांगलीच जुंपली. आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलेला दिसून येतोय. यांचा वाद मिटवण्यासाठी यांच्यात आता एकनाथ शिंदे मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. रवी राणा आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

त्याचबरोबर हा वाद कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. त्याचबरोबर बच्चू कडू यांनी यवतमाळमध्ये बोलताना एक वक्तव्य केलं ते चर्चेत आलं आहे. ‘धर्म कधीच धोक्यात येत नसतो, धोक्यात येतो तो नेता!’, कुणाचंही नाव न घेता असं बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी हा टोला नक्की कुणाला लगावला? याबाबत चर्चा झाली. बच्चु कडू यांनी हा टोला रवी राणा यांना लगावल्याचं बोललं जातंय.

बच्चू कडू बोलताना म्हणाले की, मी 15 वर्ष मेहनत केली. दिव्यांगांसाठी काम केलं. 150 गुन्हे दाखल करून घेतले. सत्ता हा महत्वाचा विषय नाही. लोकांचे प्रश्न सुटायला हवेत. कार्यकर्ते हे सेवेच्या भावनेतून पेटून उठला पाहिजे. दोन शाखा कमी करा, पण मजबूत शाखा तयार करा, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी म्हंटलं की, फुकटची प्रसिद्ध म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे. हनुमान चालीसा म्हणता येत नाही. तरी चालले तिकडं हनुमान चालीसा म्हणायला. अशावेळी हनुमानने गदा मारली मागून तर समजेल यांना, असं म्हणत त्यांनी रवी राणा यांना टोला लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT