Bacchu Kadu vs Yashomati Thakur  sakal
महाराष्ट्र बातम्या

बच्चू कडूंचा यशोमती ठाकूर यांना धक्का! अमरावती जिल्हा बँकेचा काँग्रेसचा गड ढासळला

जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख यांच्यासाठी खूप मोठा धक्का

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बच्चू कडू यांचा विजय झाला असून, त्यांनी माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर यांना जबरदस्त धक्का दिला आहे. अमरावती जिल्हा हा काँग्रेसचा गड समजला जातो. अश्यावेळी या गडाला धक्का देण्याचे काम आ.बच्चू कडू यांनी केले आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार बच्चू कडू यांचा विजय झाला असून, हा विजय आमदार बच्चू कडू यांच्यासाठी खूप महत्वाचा म्हटला जात आहे. तर दुसरीकडे अभिजीत ढेपे उपाध्यक्ष पदी विजयी झाले आहेत.

काँग्रेसचे संख्याबळ मोठ्या प्रमाणावर असतांनाही बच्चू कडू यांनी खेळी करून हा विजय मिळवला आहे. हा आमदार यशोमती ठाकूर व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख यांच्यासाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. कारण अमरावती जिल्हा हा काँग्रेसचा गड समजला जातो.

काँग्रेसची तीन मतं बच्चू कडू यांनी फोडली व विजय संपादित केला आहे. हि निवडणूक बच्चू कडू यांच्यासाठी खूप महत्वाची आणि तितकीच कठीण होती. विजय मिळाल्यानंतर हा विजय शेतकऱ्यांचा असून दडपशाहीच्या विरोधातला असल्याची प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT