Bacchu Kadu News Updates google
महाराष्ट्र बातम्या

फडणवीसांच्या पत्रानंतर राजकीय हालचालींना वेग, बच्चू कडू येणार उद्या मुंबईत

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मंगळवारी (ता.२८) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोश्यारी यांना पत्र देऊन विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी केली आहे. या पत्रात राज्यातील सद्यःस्थिती, शिवसेनेचे ३९ आमदार सरकारबरोबर राहण्यास तयार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपाल यांनी द्यावे, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे. (Bacchu Kaud Tomorrow Arrive In Mumbai, After Devendra Fadnavis Letter)

यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे गुवाहाटीत एकनाथ शिंदे गटाची बैठक होत आहे. प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) उद्या बुधवारी (ता.२८) काही अपक्ष आमदारांना घेऊन गुवाहाटीवरून मुंबईला येणार असल्याची माहिती आहे. उद्याच विदर्भातील भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईला येण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरात आज भाजप आमदारांची बैठक घेतली आहे. बैठकीनंतर सर्व आमदारांना मुंबईत बोलावल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT