Bachchu kadu Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu : याला काय अर्थय! अजित पवारांच्या बंडानंतर बच्चू कडू संतापले; थेट बोलले...

संतोष कानडे

मुंबईः राज्यामध्ये एकानंतर एक राजकीय भूकंप बघायाल मिळत आहेत. २०१९मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हा प्रयोग झाल्यानंतर, शिंदे-भाजप हा प्रयोग झाला. आता अजित पवार भाजपच्या सोबत आल्याने एक निराळा प्रयोग महाराष्ट्राला बघायला मिळतो आहे.

या सत्तेच्या गदारोळात आमदार बच्चू कडू यांची चांगलीच गोची झाली आहे. ज्या बच्चू कडूंना महाविकास आघाडी सरकारने मंत्रिपद दिलं होतं, त्या बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी होत नव्या सरकारमध्ये जाणं पसंत केलं. परंतु त्यांना नंतर मंत्रिपद मिळालं नाही.

शिंदे सरकारने बच्चू कडूंसाठी दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली परंतु कडूंना मंत्रिपदाची शपथ दिलेली नाही. शिंदे गटातले आमदार मंत्रिमंडळ विस्तारासाठी देव पाण्यात ठेवून बसलेले असतांनाच अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी झाला.

या सगळ्या गदारोळात आमदार बच्चू कडूंचे चांगलेच हाल झाले. त्यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीय. भाजपबद्दल बोलतांना कडू म्हणाले की, संख्या वाढत चालली म्हणून आम्हांला विचारणं बंद केलंय, परंतु हे योग्य नाही.

आम्हाला कसलीही कल्पना न देता अजित पवारांचा शपथविधी झाला. भाजपला साथ देणं चुकीचं ठरलं आहे, अशी थेट नाराजी त्यांनी व्यक्त केली.

कडू पुढे म्हणाले की, सरकारमधील मंत्र्यांपेक्षा आमदारांची गोची सुरु आहे. राष्ट्रवादीने, अजित पवारांनी निधी दिला नाही, असं म्हणून शिंदे गट वेगळा झाला आणि आता त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहे. आता अजित पवार हे आता आमचा निधी खेचणार. परंतु या निर्णयामुळे भाजपचं जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे, असा रोष त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT