Bageshwar Dham Dhirendra Shastri esakal
महाराष्ट्र बातम्या

Bageshwar Dham : आम्ही बागेश्वर बाबांना माफ करतो, देहू संस्थानच्या विश्वस्तांची प्रतिक्रिया

संतोष कानडे

पुणेः मध्य प्रदेशातल्या बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी एकीकडे होत असतांना देहू संस्थानने मात्र सहिष्णूतेची भूमिका घेतली आहे.

धीरेंद्र शास्त्री महाराज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. संत तुकाराम महाराज यांची पत्नी रोज त्यांना मारायची त्यामुळे ते देवाची भक्ती करु शकले, अशा आशयाचं विधान बागेश्वर बाबांनी केलं आहे.

त्यावर भाजप अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले म्हणाले की, बागेश्वर बाबांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला आहे. केवळ तुकाराम महाराजांचाच नव्हे तर महाराष्ट्राचाही अवमान झाला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी.

देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी मात्र बागेश्वर बाबांना माफी दिली आहे. ते म्हणाले की, तुकाराम महाराजांच्या पत्नी आमच्या मातोश्री आहेत. ज्यांनी तुकोबारायांना घास घातल्याशिवाय अन्नाचा कन घेतला नाही. तुकाराम महाराजांसाठी ज्यांनी आयुष्यभर त्यागाची भूमिका घेतली, त्यांच्याबद्दल असं विधान चुकीचं आहे. त्यांच्या बाबतीत ऐकीव माहितीद्वारे चुकीचं वक्तव्य करु नये. वारकरी सांप्रदाय हा सहिष्णू आहे. आम्हीही त्यांना माफ करतो, असं मोरे महाराज म्हणाले.

काय म्हणाले बागेश्वर बाबा?

महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज यांना त्यांच्या पत्नी रोज मारत असत. त्यांना रोज काठीने मारत होते. त्यावेळी त्यांना कोणीतरी विचारले तुम्हाला पत्नी मारते, तुम्हाला काहीच वाटत नाही का? तर तुकाराम महाराज म्हणाले, देवाची कृपा आहे की मला मारणारी पत्नी मिळाली. प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. पत्नीच्या चक्करमध्ये पडलो असतो. पण मारणारी पत्नी मिळाली तर मला संधी मिळाली देवावर प्रेम करण्याची, असे वादग्रस्त विधान बागेश्वर महाराजांनी केले. त्यामुळे त्यांचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT