Bajrang Sonavane sakal
महाराष्ट्र बातम्या

Bajrang Sonawane: बजरंगाची कोलांटी उडी? "बीडच्या बाप्पाचा अजित पवारांना फोन," त्या ट्वीटमुळे खळबळ

Ajit Pawar: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यामध्ये जायन्ट किलर बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता.

आशुतोष मसगौंडे

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यामध्ये जायन्ट किलर बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे यांच्या निवकटवर्तीय असलेल्या सोनावणे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रावादीतून शरद पवार यांच्या राष्ट्रावदीत प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच सोनावणे यांना बीडची उमेदावारी मिळाली होती.

आता लोकसभा निकाल लागून एक आठवडाही झाला नाही तोवर बजरंग सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोरल मिटकरी यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर खळबळजनक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला असल्याचे म्हटले आहे.

आपल्या एका ओळीच्या पोस्टमध्ये मिटकरी म्हणाले, "बीडच्या बप्पाचा दादांना फोन" आणि याबरोबर #मोठ्यामनाचादादा असा हॅशटॅग वापरला आहे.

याबरोबरच अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी बोलतानाही खासदार बजरंग सोनावणे यांचा अजित पवार यांना फोट केल्याचे म्हटले आहे.

आमदार मिटकरी म्हणाले, सोनावणे यांच्यानंतर दुपरी अडीच वाजताही एक फोन येऊन गेल्याचे मला कळते आहे. त्यामुळे आगे आगे देखो होता क्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी तुम्हाल राज्याच्या राजकारणात वेगळे चित्र पाहायला मिळेल.

या फोनमागे नेमके कारण काय? असा प्रश्न विचारला असता मिटकरी म्हणाले, यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे मी लढलोय, जिंकूण पण आलोय आणि आता निवडून आल्यानंतर जनतेमध्ये जायचे असते त्यासाठी मागे कुणाचातरी आधारही लागतो. त्यामुळे चूक झाली पदरात घ्या असा फोनमागे अर्थ असू शकतो.

दरम्यान बीडची लोकसभा निवडणूक यंदा खूप प्रतिष्ठेची झाली होती. यामध्ये एका बाजूला भाजपच्या दिग्गज नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडो होत्या. तर दुसऱ्या बाजूला नवखे बजरंद सोनावणे.

पंकजा मुंडेच्या बाजून कॅबिनेट मंत्री धनजंय मुंडे, जिल्हात्याली महायुतीतील सर्व आमदार होते. तर बजरंग सोनावणे यांच्याकडे फक्त बीडचे आमदार संदीप क्षीरसागर होते. अशा परिस्थितीत सोनावणे यांनी विजय मिळवल्याने त्यांची राज्यभरात चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग १०व्या दिवशी चौकशी

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणातील 'त्या' पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याने 65 जणांवर गुन्हा; तुमच्याही मोबाईलमध्ये 'ते' व्हिडिओ आहेत?

SCROLL FOR NEXT