Bala-Nandgaonkar 
महाराष्ट्र बातम्या

बाकी सगळे...जय हिंद, जय महाराष्ट्र ! बाळा नांदगावकरांची उद्धव ठाकरेंवर टीका

बाळा नांदगावकरांची उद्धव ठाकरेंवर टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई येथील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandagonakr) यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ट्विटमध्ये नांदगावकर म्हणाले, शिवाजीपार्क सभेचा अनभिषिक्त सम्राट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे. बाकी सगळे... जय हिंद, जय महाराष्ट्र, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. (Bala Nandagaonkar Criticize Uddhav Thackeray For Public Rally In Mumbai)

ठाकरे यांनी आज विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. या प्रसंगी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत उपस्थित होते. आमचं हिंदुत्व नकली नाही. डोक्यात हिंदुत्व लागतं.

दाऊद जर भाजपात आला, तर त्याला ही मंत्री करतील. महाराष्ट्राला बदनाम करताय, असा आरोप ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर केला. नुसतं बोंबलायचं. संयम पाळतो. याचा अर्थ आम्ही नामर्द नाही. एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्र विद्रूप करण्याचा काम भाजप करत असल्याचे ते म्हणाले. आता कोणाला अयोध्याला जायचं जाऊ द्या, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sikandar Shaikh: मुळशी पॅटर्नचा थरार! महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखवर आखाड्यातच हल्ल्याचा प्रयत्न, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Pune News : आजारांच्या वेदनांवर आरोग्य विभागाची फुंकर; वेदनादायक आजारांवर मिळणार जवळच पूरक उपचार

SSC Board Exam: विद्यार्थ्यांच्या भवितव्याची पहिली मोठी परीक्षा; दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, उत्साहाचे वातावरण

Latest Marathi News Live Update : राज्यात दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी केली परीक्षेसाठी नोंदणी

Green Book Record: साक्षीच्या विक्रमाची ‘ऑरेंज’ अन्‌ ‘ग्रीन बुक’मध्ये नोंद; शिवजयंतीदिनी सलग १२ तास १२ मिनिटे १२ सेकंद दांडपट्टा फिरवून घडवला इतिहास!

SCROLL FOR NEXT