Balasaheb Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Balasaheb Thackeray : उद्धव ठाकरेंसाठी सेनेने बनवलेले खास पद, कोणी मांडलेला प्रस्ताव जाणून घ्या

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जयंतीला उध्दव ठाकरे यांच्यासाठी नवं पद निर्माण करण्यात आलं.

सकाळ डिजिटल टीम

Balasaheb Thackeray Jayanti : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज कोणाची, धनुष्यबाणाचं चिन्ह कोणाचं यावरून वाद चाललेले असताना, आजपासून १० वर्षांपूर्वी उध्दव ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेत एक पद निर्माण करण्यात आलं होतं. तर शिवसेनाप्रमुख हे पदही गोठवण्यात आलं होतं. कोणी सुचवलं होतं हे पद? त्यामागची रंजक कहाणी काय आहे जाणून घेऊया.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नोव्हेंबर २०१२ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जयंतीला २०१३ मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या अध्यक्षपदी औपचारीक निवड करण्यात आली होती. त्याशिवाय आदित्य ठाकरेंनाही सिवसेनेत नेतेपद देण्यात आले.

शिवसेनेच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्यात आले. त्यावर उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. मुबईच्या शिवसेना भवनात राष्ट्रीय कार्यकारीणीत हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

कोणी मांडला प्रस्ताव?

उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव सर्वप्रथम गजानन किर्तीकर यांनी मांडला होता. त्याला दिवाकर रावतेंनी अनुमोदन दिलं होतं. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. याचवेळी शिवसेना प्रमुख पद गोठवण्यात आलं होतं. शिवाय कार्याध्यक्ष हे पद रद्द करण्यात आलं. याव्ळी शिवसेना प्रमुख हे केवळ बाळासाहेब ठाकरेच होते, दुसरा कोणी त्यापदावर बसू शकत नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT