raj thackeray on balasaheb thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : भाजपला सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं होतं, पण...; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

संतोष कानडे

मुंबईः विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण आज करण्यात आलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील दिग्गज नेत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

यावेळी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या मराठी प्रेमाबद्दलची एक आठवण सांगितली. मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी कधीही सत्तेची पर्वा केली नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. सुरेश जैन यांच्याबद्दलचा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला.

काय म्हणाले राज ठाकरे?

बाळासाहेब ठाकरे कडवट मराठी होते. १९९९ सालची गोष्ट आहे. काही कारणास्तवर शिवसेना-भाजप युती मुख्यमंत्रीपदावर अडत होती.१५-२० दिवस राजकारण सुरु होतं. आमदारांचं इकडे-तिकडे जाणं सुरु होतं. एके दिवशी दुपारच्या वेळेला 'मातोश्री'वर दोन गाड्या आल्या.

त्यातून जावडेकर आणि आणखी भाजपचे दोन-चार जण आले. बाळासाहेबांना भेटायचय म्हणाले. आज आपलं सरकार बसेन, त्यामुळे बाळासाहेबांची भेट महत्त्वाची आहे म्हणाले. परंतु बाळासाहेब झोपले होते. राज ठाकरे म्हणाले निरोप देतो पण भेट शक्य नाही.

बाळासाहेब झोपले होते. राज ठाकरेंनी त्यांना उठवून निरोप दिला की, भाजपचे नेते आले आहेत, त्यांनी सांगितलंय की संध्याकाळपर्यंत सरकार बसेल. सुरेश जैन मुख्यमंत्री असतील ते आमदारांची जुळवाजुळव करतील.

त्यावर बाळासाहेब म्हणाले, त्यांना जावून सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच असेल दुसरा असणार नाही.असं म्हणून ते पुन्हा झोपी गेले. मराठी बाण्यासाठी या माणसाने माझ्यासमोर सत्तेवर लाथ मारल्याची आठवण राज ठाकरेंनी सांगितली.

"मी लहानपणापासून बाळासाहेबांच्या सहवासात राहिलो म्हणून मी ज्या गोष्टी पाहू शकलो त्यामुळेच मी स्वतःचा राजकीय पक्ष काढू शकलो. नसता माझी हिम्मत झाली नसती. त्यामुळं यश आलं तरी हुरळून जात नाही, पराभव झाला तरी मी खचून जात नाही.'' अशा भावना राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT