पीककर्जासाठी बॅंकांची अट! एवढे 'सिबिल' असेल तरच मिळणार कर्ज
पीककर्जासाठी बॅंकांची अट! एवढे 'सिबिल' असेल तरच मिळणार कर्ज Sakal
महाराष्ट्र

पीककर्जासाठी बॅंकांची अट! एवढे 'सिबिल' असेल तरच मिळणार कर्ज

तात्या लांडगे

कर्जाच्या नियमित परतफेडीवर संबंधिताची पत ठरविली जात आहे. किमान 600 ते 700 पर्यंत सिबिल असणाऱ्या शेतकऱ्यांनाच बॅंका कर्जवाटप करीत आहेत.

सोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या (Reserve Bank) निकषानुसार आता पीककर्ज (Crop Loan) वा मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी 'सिबिल'चा (Credit Information Bureau India Limited - CIBIL) निकष लागू करण्यात आला आहे. कर्जाच्या नियमित परतफेडीवर संबंधिताची पत ठरविली जात आहे. किमान 600 ते 700 पर्यंत सिबिल असणाऱ्या शेतकऱ्यांनाच बॅंका कर्जवाटप करीत आहेत.

बॅंकांकडून पीककर्ज मिळविण्यासाठी सात-बारा, आठ-अ, सहा-ड, पॅनकार्ड, आधारकार्ड अशा कागदपत्रांची गरज आहे. दुसरीकडे, अन्य कोणत्याही बॅंकांचे कर्ज नसल्याचे दाखलेही द्यावे लागत होते. परंतु, आता त्यात बदल करून "सिबिल'ची पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने बॅंका आता सिबिलच्या माध्यमातून कर्जदाराची पत ठरवू लागल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेने चार कंपन्यांबरोबर करार केला असून, त्यांच्या माध्यमातून कर्जदाराची पत पडताळली जात आहे. दुसऱ्या कोणत्याही फायनान्स कंपन्या अथवा बॅंका, पतसंस्था किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज थकीत असल्यास त्या व्यक्‍तीला कर्जवाटप केले जात नाही. या निकषामुळे बॅंकांची थकबाकी कमी होण्यास मदत झाली असून, त्यातून अनेकांचे व्यवहारदेखील सुधारल्याचे अनुभव बॅंकांनी सांगितले.

सिबिल म्हणजे काय?

शेतकरी असो वा नोकरदारांनी बाहेरील कोणत्याही बॅंकेकडून कर्ज घेतल्यास अथवा संबंधित व्यक्‍ती कोणाला जामीनदार झाल्यास त्याची संपूर्ण माहिती आता बॅंकांना "सिबिल'च्या माध्यमातून समजू लागली आहे. ती व्यक्‍ती कोणत्या बॅंकेची थकबाकीदार आहे का, ज्याला जामीनदार आहे ती व्यक्‍ती कर्जाची नियमित परतफेड करते का, याचीही माहिती त्यामध्ये येते. कोणत्याही बॅंकेकडून कर्ज घेतले आणि त्याचे हप्ते नियमित परतफेड होत असतील, तर तो शेतकरी कर्जासाठी पात्र ठरतो. थकबाकी असलेल्यांना कर्जवाटप करता येत नाही.

जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही शेतकऱ्यांची बॅंक आहे. परंतु, थकबाकी कमी व्हावी, शेतकऱ्यांची कर्ज घेण्याची पत वाढावी म्हणून कर्ज मागणाऱ्यांचे सिबिल चेक केले जाते. किमान 600 पर्यंत सिबिल असल्यास त्याला कर्जवाटप केले जाते.

- शैलेश कोथमिरे, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सोलापूर

बॅंकनिकाय "सिबिल'चे निकष...

  • ज्या शेतकऱ्यांचे सिबिल किमान 675 आहे, त्याला बॅंक ऑफ इंडियाकडून मिळते कर्ज

  • विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक ही 650 सिबिल असलेल्यांनाच करते कर्जवाटप

  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचे असावे 600 पर्यंत सिबिल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT