Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : "काहीही असो आम्ही..." ; उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांचा आधार!

सकाळ डिजिटल टीम

Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला आहे. एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष आता त्यांच्यासोबत नाही. पक्षाचे नाव शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाला निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे उद्धव ठाकरे गटाने सांगितले. 

दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिवसेना नाव आणि चिन्हाचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शिवसैनिकांकडून मुंबईत बॅनर लावण्यात आलेत. 


शिवसेना भवनाखाली बॅनर लावण्यात आले आहेत. निर्णय काहीही असो आम्ही शिवसैनिक कायम मातोश्री आणि ठाकरे परिवारासोबत एकनिष्ठ असणार आहोत, असे बॅनर सेनाभवनाखाली लावण्यात आला आहेत. 

उद्धव ठाकरेंकडे पर्याय -

उद्धव ठाकरे यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार ते निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात न्यायालयात अपील दाखल करू शकतात. त्यांचा युक्तिवाद निवडणूक आयोगाने विचारात घेतला नसल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: भारतीय फिल्डर्सना काय झालं? एकाच ओव्हरमध्ये सोडल्या तीन रनआऊटच्या संधी अन् मग अफगाणिस्तानच्या खेळाडूचं शतक

Gold Rate: आनंदाची बातमी! सोने आणि चांदीच्या किंमती कमी आणखी कमी होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, पण कोणता?

Viral : महिलेवर अत्याचार केल्याचा खोटा आरोप, 20 वर्षांपासून तुरुंगात, 43 व्या वर्षी निर्दोष सुटका; बाहेर येताच त्याने...पाहा VIDEO

पुणेकरांनो लक्ष द्या! दिवे घाटातील वाहतूक राहणार बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन, पण कधी?

विमानात अचानक तरुणाचा धिंगाणा! कपडे काढून घातला गोंधळ, अखेर करावी लागली इमरजन्सी लँडिंग, पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT