devyani pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Baramati News: बारामतीच्या देवयानी पवार शेप साउथ एशिया 2023 साठी आमंत्रित

देवयानी आणि त्यांच्या टीम ने बारामती व आसपास च्या परिसरातील हवामान बदलावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुढाकार

मिलिंद संगई, बारामती

बारामती - वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) यांच्या वतीने नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित केलेल्या प्रतिष्ठित ग्लोबल शेपर्स परिषदेत देवयानी पवार यांना शेप साउथ एशिया 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पुरस्कृत ग्लोबल शेपर्स कम्युनिटीद्वारे आयोजित केलेल्या ह्या उपक्रमामध्ये क्लायमेट चेंज रोखण्यासाठी बारामती व आसपासच्या परिसरात हबने केलेले काम त्या सादर करणार आहेत.

देवयानी आणि त्यांच्या टीम ने बारामती व आसपास च्या परिसरातील हवामान बदलावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे सकारात्मक बदल घडून येत आहे. शेप साउथ एशिया सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देवयानी यांना मिळालेली संधी देशासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.

दक्षिण आशियातील देशांमधील बदलते वातावरण व त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील या उद्देशाने या परिषदेत सविस्तर चर्चा होणार आहे. ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या बारामती विभागात निवडून आलेली व क्युरेटर असलेल्या देवयानी पवार या जागतिक व्यासपीठावर आपले विचार व्यक्त करणार आहे. हवामान बदलामुळे ग्रामीण भागात निर्माण झालेले प्रश्न व समस्या यांचे सादरीकरण त्या करणार आहेत.

देवयानी पवार शेप साउथ एशिया 2023 साठी आमंत्रित, बारामती हबच्या ग्रामीण सहकाऱ्यांसोबत बारामती हबचे प्रतिनिधीत्व करणार आहे. 19 ते 21 मे दरम्यान काठमांडूला ही परिषद होत आहे. ग्लोबल वार्मिंगच्या समस्येमुळे ग्रामीण जीवनावर होणारे विविध परिणाम, त्यांची तीव्रता व लोकांना येत असलेल्यास विविध समस्यांबाबत देवयानी पवार काठमांडू येथे सादरीकरण करणार आहेत.

बारामती परिसरातील हवामान बदलांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी देवयानी व त्यांच्या टीमने पुढाकार घेतला आहे. सामूहिक प्रयत्न केल्यानंतर होणारे बदल व साधणारे परिणाम, तसेच सकारात्मक परिणाम व बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने देवयानी काम करीत आहे.

शेप साउथ एशिया 2023 मधील तिचे प्रतिनिधित्व हबच्या नाविन्यपूर्ण पध्दती आणि समुदायांसाठी शाश्वत आणि लवचिक भविष्य निर्माण करण्यासाठी योगदानावर प्रकाश टाकते. हवामान बदलांमुळे ग्रामीण भागात होणारे परिणाम व त्या वरील उपाययोजना तसेच नुकसान टाळण्यासाठी काय करता येईल या बाबत या परिषदेत सांगोपांग चर्चा होणार आहे. गतवर्षी जिनिव्हा येथे झालेल्या परिषदेतही त्यांनी ग्रामीण भागाचे प्रतिनिधीत्व केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT