Sharad Pawar, Supriya Sule and Uddhav Thckeray  
महाराष्ट्र बातम्या

Baramati : आपण इंडिया आघाडीत, सुप्रिया सुळेंना ताकद द्या, पण...; ठाकरेंच्या नेत्यांना सूचना

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या स्थिती संदर्भात उद्धव ठाकरेंनी स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून आढावा बैठकीत माहिती घेतली. इंडिया आघाडीमध्ये आपण असल्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे यांना आपल्या पक्षाकडून ताकद द्या, त्यांना साथ द्या, अशा सूचना उद्धव ठाकरेंकडून नेत्यांना देण्यात आल्या आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद किती, यासंदर्भात विधानसभा निहायसुद्धा उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात आपण कोणत्या विधानसभा जागेसाठी विचार करू शकतो, या संदर्भात नेत्यांना विचारणा केली.

खडकवासला विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळावी अशी इच्छा स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीत व्यक्त केली. या लोकसभा मतदारसंघात आपण इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद देणार आहोत. तर खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी आपण प्रयत्न करायला हवा, असं म्हणणं नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे समोर मांडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT