Uday Samant Sakal
महाराष्ट्र बातम्या

Barsu Refinery Project : अश्रूधूर नाहीच! आंदोलकांनी वणवा लावल्याचा उदय सामंत यांचा दावा

बारसू रिफानरी विरोधातील आंदोलक आक्रमक झाले आहेत. सर्वेक्षण बंद पाडण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत.

वैष्णवी कारंजकर

बारसू रिफायनरीच्या विरोधातलं आंदोलन आता चिघळताना दिसत आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला आहे. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंदोलकांवरच खापर फोडल्याचं दिसून येत आहे.

बारसू प्रकल्पाच्या जमिनीचं सध्या माती सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण रोखण्यासाठी बारसू आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांना सर्वेक्षण स्थळी जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला आहे. माध्यमांशी बोलताना अनेक आंदोलकांनी याबद्दल माहिती दिली आहे. तसंच या अश्रूधुरामुळे आंदोलकांना त्रास होऊ लागल्याचंही चित्र आहे.

मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या कार्यालयातून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी आंदोलकांनीच आग लावल्याचा दावा केला आहे. सामंत म्हणाले, "अश्रूधुराच्या नळकांड्या कुठेही फोडण्यात आलेल्या नाहीत. आंदोलकांनी गवताला जी आग लागली, ती विझवताना तो धूर आलेला आहे. अशा वेड्यावाकड्या बातम्या बाहेर जात आहेत. काहीतरी गैरसमज आहे. तिथे वणवा लावण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला होता. ते विझवायचा पोलीस प्रयत्न करत होते, त्यातून आलेला तो धूर आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Crime: बनावट क्यूआर कोड अन् फर्म...; बनावट औषधांच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश, 'इतका' मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates: निफाड साखर कारखान्याला पिंपळस ग्रामपालिकेडून सील

SCROLL FOR NEXT