CM Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Barsu Refinery News : स्थानिकांच्या समंतीनेच बारसू रिफायनरी प्रकल्प होणार ; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं

Sandip Kapde

Barsu Refinery News | सातारा: रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रकल्पाला (आरआरपीएल) महाराष्ट्रातील रत्नागिरीत विरोध सुरू झाला आहे. या आंदोलनात अनेक शेतकरी देखील सहभागी झाले आहेत. प्रकल्पासाठी मातीचे संशोधन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ सुमारे सहा गावांतील 500 हून अधिक लोक रस्त्यावर उतरले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनीच या प्रकल्पासाठी केंद्राला पत्र पाठवले आहे. त्यामुळे ते आता का विरोध करतात हा संशोधनाचा विषय आहे. ही त्यांची कुठली भूमिका आहे. मला कळत नाही. जनता याचा विचार करेल. लोकांवर अन्याय करुन हा प्रकल्प होणार नाही, स्थानिकांच्या समंतीने हा प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगार निर्मीती होणार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

बारसू येथील प्रकल्पामुळे प्रदुषण होणार नाही. हा प्रकल्प नानार येथे होणार होता मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हा प्रकल्प बारसू  येथे करावा, असे पत्र उद्धव ठाकरे यांनी केंद्राला लिहले होते. आता मुख्यमंत्री पद गेले म्हणून उद्धव ठाकरे विरोध करत आहेत. त्यांनी समृद्धी महामार्गाला देखील विरोध केला होता. हा त्यांचा दुट्टपीपणा आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे सुट्टीवर असल्याची चर्चा रंगली होती. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, महाबळेश्वर दापोली रस्त्याचे उद्घाटन केले. आता साताऱ्यात अधिकाऱ्यांची बैठक घेतली ही बैठक देखील महत्वाची आहे. घरी अडीच वर्ष बसलेल्यांनी मी दोन-तीन दिवस इकडे गेलो तिकडे गेलो, अशी चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये सर्वात मोठा बदल! पत्ता आणि जन्मतारीख गायब होणार, फक्त 'या' गोष्टीवरून तुमची ओळख पटणार

Pune News : नवले पूल येथे तातडीने उपाययोजना करा; नितीन गडकरींचे आदेश

Pune MHADA Housing Lottery : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाच्या ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

Tamhini Ghat Accident : स्वप्नांची भरारी अर्धवट ठेवून सहा तरुणांना काळाने गाठलं

समझो हो गया...! Smriti Mandhana ने एकदम स्टाईलमध्ये दाखवली एंगेजमेंट रिंग! जेमिमा रोड्रिग्सने शेअर केला Video

SCROLL FOR NEXT