Barsu Refinery News 
महाराष्ट्र बातम्या

Barsu Refinery News: "उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असते तर...", उदय सामंत यांचा मोठा खुलासा!

Sandip Kapde

Barsu Refinery News: भारत सरकारला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर एक मेगा ऑइल रिफायनरी प्रकल्प उभारायचा आहे. २०१५ मध्ये, 'रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड' प्रकल्प रत्नागिरी, महाराष्ट्र येथे बांधला जाईल, अशी घोषणा करण्यात आली. यापूर्वी हा प्रकल्प रत्नागिरीतील नाणारमध्ये बांधण्यात येणार होता, मात्र शिवसेना आणि स्थानिक लोकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प ऐनवेळी थांबवला होता.

मात्र ठाकरे सरकार सत्तेवर येताच त्यांनी हा प्रकल्प नाणारऐवजी बारसू-सोलगावमध्ये उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला. शासनाच्या संमतीनंतर पुन्हा हा प्रकल्प होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र आता बारसू-सोलगावमध्ये देखील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असते तर त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला नसता, असे उदय सामंत म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने ठाकरे बारसू प्रकल्पाला विरोध करत आहेत. यावेळी सामंतानी उद्धव ठाकरे यांनी केंद्राला २०२२ मध्ये लिहलेल्या पत्राचा देखील दाखला दिला. बारसू येथील जमीन उद्धव ठाकरे यांनीच सुचवली होती, असे सामंत म्हणाले.

आंदोलक शेतकऱ्यांचा गैरसमज दुर करण्याची जमीन सर्वपक्षीयांची आहे,असे सामंत म्हणाले. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांचा गैरसमज दुर करण्यात येईल. राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेले ट्विट गैरसमजातून केले आहे. पत्रकारांचा अपमान झाला असेल, तर पालकमंत्री या नात्याने मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रामुळे सर्वेक्षण सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी मताचे राजकारण करु नये. राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकारण सुरू आहे, असा आरोप उदय सामंत यांनी केले आहे. नुसत खोके आणि गद्दार म्हणून चालणार नाही, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Wedding Destination: शोधताय? हिमालयाच्या कुशीतलं हे मंदिर बनतंय नवविवाहितांचं आवडतं ठिकाण, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

SCROLL FOR NEXT