barsu refinery row sushma andhare claim former mla Ashish Deshmukh along with many administrative officers owns land in barsu  
महाराष्ट्र बातम्या

Barsu Refinery Protest : रिफायनरी नेमकी कोणासाठी? बारसूमध्ये आशिष देशमुख यांच्यासह आधिकाऱ्यांच्या कोट्यावधींच्या जमिनी

रोहित कणसे

Barsu Protest Update : रत्नागिरी जिल्ह्यात बारसू येथील रिफायनरीला स्थानिकांकडून जोरदार विरोध केला जात आहे. राज्य सरकारकडून विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यान सरकारी मोबदल्यासाठी बारसू येथे सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या अधिकारी आणि नेत्यांनी स्वस्तात जमिनी खरेदी केल्याचा आरोप विरोधीपक्षांकडून केला जात आहे

यादरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)यांनी गंभीर आरोप केले आहेत. अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत बारसूमध्ये जमीन घेतलेल्या अधिकारी आणि नेत्यांची यादीच वाचून दाखवली आहे.

सत्ताधाऱ्यांनी आपल्या जवळचे नेते आणि आधिकाऱ्यांना बारसूमध्ये स्वस्तात जमीनी दिल्याचा आरोप केला जात आहे. यादरम्यान आता बड्या अधिकाऱ्यांच्या तसेच नेत्यांच्या जमीनी बारसूमध्ये असल्याचा दावा अंधारेंनी केला आहे. त्यांनी जमीन मालकांची नावे जाहीर केली आहेत यामध्ये आशिष देशमुख यांची १८ एकर जागा बारसूमध्ये असल्याचे देखील अंधारे म्हणाल्या आहेत.

सुषमा अंधारे म्हणाल्या की...

अखिलेश गुप्ता आणि नमिता गुप्ता यांची ९२ एकर जमीन बारसूमध्ये आहे. हे दोघं कोण आहेत? आयआरएस आधिकारी आहेत. मला कळत नाही की आधिकाऱ्यांना एवढा पगार असतो का की ते ९२ एकर जमीन विकत घेऊ शकतात. मी गरीब आडाणी आहे, किरीटभाऊंना याच्यातलं जास्त कळतं. त्यांनी हे ९२ एकरचं काय प्रकरण आहे ते समजून घेतलं पाहिजे. हे आधिकारी आहेत ज्यांची ९२ एकर जमीन आहे आणि जे ४० ते ५० लाख रुपयांचा भाव ही जमीन रिफायनरीसाठी सोडण्याकरिता मागत आहेत याबद्दल किरीट सोमय्या यांनी बोललं पाहिजे असे अंधारे म्हणाल्या आहेत.

बारसूमध्ये जमिनी कोणी घेतल्या…

सुषमा अंधारेंनी यादी वाचून दाखवताना घेतलेली नावे पुढीलप्रमाणे-

अकांक्षा वाकाळकर ११३ गुंटे, धार्मील झवेरी ३ हेक्टर, सोनल शाह ७.५ हेक्टर, निकेश शाह १५६ गुंटे, विकेश शाह ३ हेक्टर, रुपल शाह ४ हेक्टर अपर्णा शाह १० हेक्टर, देवेंद्र शर्मा साडेचार हेक्टर, अनुराधा रेड्डी पाच हेक्टर, सोनल शाह २ हेक्टर, श्रीकांत मिश्रा २ हेक्टर, देवेंद्र शर्मा ६ हेक्टर, शशिकांत शाह साडेचार हेक्टर, नरेंद्र सिसोदीया साडेचार हेक्टर आणि शेवटी सध्या भाजपच्या संपर्कात असलेले, काँग्रेसमधून राजिनामा देत बाहेर पडलेले अशिष देशमुख १८ एकर.

यावेळी सुषमा अंधारेंनी या यादीच मराठी माणसं किती आहेत याचा देखील तपास झाला पाहिजे असेही म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT