video recording Sakal
महाराष्ट्र बातम्या

सभा, मोर्चात बोलताना जरा जपून, पोलिसांकडून केले जाते भाषणांचे रेकॉर्डिंग; गर्दीचेही होणार चित्रण; शांततेचा भंग करणाऱ्या वक्तव्यांवर लक्ष, कारण...

सोलापूर शहरात वेगवेगळ्या कारणातून धरणे, मोर्चा, आंदोलने केली जातात, याची नोंद पोलिस दरबारी असते. समोरील गर्दी जास्त दिसली की अनेकजण चिथावणीखोर भाषणे करतात. त्यातून पुढे दंगली, भांडणे, तेढ, तणाव निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर प्रत्येक सभा, मोर्चाच्या ठिकाणी जमलेली गर्दी व सभेतील प्रमुख नेत्यांच्या भाषणांचे व्हिडिओ चित्रणासाठी साध्या वेशातील पोलिस नेमले जात आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरात वेगवेगळ्या कारणातून धरणे, मोर्चा, आंदोलने केली जातात, याची नोंद पोलिस दरबारी असते. समोरील गर्दी जास्त दिसली की अनेकजण चिथावणीखोर भाषणे करतात. त्यातून पुढे दंगली, भांडणे, तेढ, तणाव निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर प्रत्येक सभा, मोर्चाच्या ठिकाणी जमलेली गर्दी व सभेतील प्रमुख नेत्यांच्या भाषणांचे व्हिडिओ चित्रणासाठी साध्या वेशातील पोलिस नेमले जात आहेत.

सोलापूर शहरात दरवर्षी सरासरी २०० दिवस जिल्हा परिषदेजवळील पूनम गेटसमोर धरणे, आंदोलने, मोर्चा निघतात. याशिवाय विविध ठिकाणी सभा होतात. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा असतो. त्या ठिकाणी संबंधित पोलिस ठाण्याचा बंदोबस्त असतो. त्यासाठी स्थानिक पोलिसांकडून परवानगी देखील बंधनकारक आहे. संबंधित घटकाने त्यांच्या रास्त मागण्या कायद्याच्या चौकटीत राहून शासनापर्यंत मांडाव्यात, अशी अपेक्षा असते. कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हे देखील दाखल होतात.

याशिवाय सभांमधील भाषणांमधून सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडली तर पोलिस अंमलदारांनी काढलेले व्हिडिओ चित्रीकरण पाहून त्यानुसार त्यासाठी कारणीभूत सर्वांवर गुन्हे दाखल केले जातात. दुसरीकडे कोणाच्या सभेला कोणते लोक येतात, किती लोक येतात म्हणजे गर्दी किती होऊ शकते, याचाही अंदाज पोलिसांना त्या रेकॉर्डिंगमुळे येतो. त्यामुळे गोपनिय विभागातील अंमलदारांकडून त्या सभा, मोर्चा, आंदोलनाच्या ठिकाणचे चित्रीकरण केले जाते.

...म्हणून पोलिसांकडून केले जाते व्हिडिओ रेकॉर्डिंग

सभा, मोर्चा, धरणे अशा ठिकाणी कोणी चिथावणीखोर भाषण करू नये, दोन धर्मात किंवा जातींमध्ये तेढ निर्माण होईल, असे भाष्य टाळावे. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यादृष्टीने शहर पोलिसांचे सतत प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाचे पोलिसांकडून रेकॉर्डिंग केले जाते.

- राजन माने, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे), सोलापूर शहर

घटनेच्या तपासासाठी रेकॉर्डिंगचा आधार

अनेकदा सभा, मोर्चातील गर्दी पाहून कोणीतरी चिथावणीखोर भाषण करते. त्यातून पुढे दोन जाती-धर्मात तेढ निर्माण होऊन दंगली देखील होतात. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाचा आधार घेऊन तपास केला जातो. न्यायालयात देखील व्हिडिओ चित्रीकरणाचा पुरावा ग्राह्य मानला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Delhi Red Fort blast Live Update : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रूग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट; घटनास्थळाचीही पाहणी केली

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

SCROLL FOR NEXT