Marathi News Maharashtra Beer Price increased  
महाराष्ट्र बातम्या

बिअर पिण्याची इच्छा असूनही लोकांचा होतोय नाईलाज! हार्ड ड्रिंककडे वळतोय कल, जाणून घ्या कारण

कार्तिक पुजारी

मुंबई- गेल्या काही वर्षापासून बिअरच्या वापरात वाढ होत नसल्याचं दिसून येत आहे. सरकारकडून वारंवार करण्यात आलेल्या टॅक्स दरांतील बदलांमुळे हा परिणाम झाल्याचं इंडस्ट्री तज्ज्ञाचं मत आहे.नव्या माहितीनुसार, ६५० एमएम स्ट्राँग बिअरची किंमत २०१४ ते २०२२ पर्यंत ६४ टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे, १८० एमएल हार्ड ड्रिंकची किंमत १० ते २० टक्क्यांनी वाढली आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि नाशिक सारख्या शहरांमध्ये लोकांकडून बिअरला अधिक पसंती दिली जात होती. पण, गेल्या काही वर्षांमध्ये अबकारी करांमध्ये ३० टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बिअरच्या किंमती वाढल्यात, तर दुसरीकडे हार्ड ड्रिंकच्या किंमतींमध्ये कमी प्रमाणात वाढ झालीये. त्यामुळे मद्यप्रेमींचा कल हार्ड ड्रिंककडे वळत आहे.

हार्ड ड्रिंकपेक्षा बिअर घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले जाते. पण, वाढत्या किंमतींमुळे लोक हार्ड ड्रिंक घेण्याकडेच वळत आहेत. याशिवाय बिअर इंडस्ट्रीच्या वाढीवर याचा दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पॉलिसी मेकर्सनी याबाबत काही निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. अबकारी करात कपात करणे आणि बिअर आणि वाईन देणाऱ्या पब्संना लायसेन्स फीमध्ये २० टक्क्याची सूट देणे असे काही उपाय सूचवले जात आहेत.

इतर राज्यात काय स्थिती

देशातील काही राज्यांनी बिअरचा वापर वाढण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. यात ओडिशाने हार्ड मद्यावर १० टक्के अबकारी कर वाढवला आहे. तसेच मॉल्स आणि कमर्शियल स्टोअरमध्ये बिअर विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशने बिअर आणि हार्ड ड्रिंकमधील अबकारी करांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. पंजाबने फक्त बिअर विकण्याचे रिटेल शॉप सुरु केले आहेत.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील बिअरच्या किंमतीवर अबकारी कर जास्त आहे. त्यामुळे अनेकजण कमी अल्कोहोलचे प्रमाण असलेले मद्य पिण्याची इच्छा असूनही हार्ड ड्रिंककडे वळत आहेत. बिझनेस स्टँडर्डने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या भाषणानंतर सोनं 1,600 रुपयांनी महाग; चांदी 2 महिन्यांच्या उच्चांकावर; काय आहे ताजा भाव?

रितेश देशमुखने चक्क देव्हाऱ्यात ठेवलीये महाराजांशी संबंधित ती गोष्ट, ऐकून विकी कौशलही झाला भावुक; काय आहे ती वस्तू?

NEET UG 2026 Exam Cancelled: ९ वर्षांत १६ हून अधिक परीक्षा रद्द! २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून NTA का अन् कशी अपयशी ठरत आहे?

Leopard Captured : चाकणला मर्सिडीज बेंज कंपनीतील बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

Metro 13 : मिरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ ला प्रतीक्षा मंत्रिमंडळाच्या मान्यतेची

SCROLL FOR NEXT