Ajit Pawar on uddhav thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादीची भूमिका केली स्पष्ट

संतोष कानडे

मुंबईः आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुंबई महानगरपालिका आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकांसंदर्भात चर्चा होईल. त्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यामुळे आम्हाला नाराज होण्याचा काहीच प्रश्न नाही. आम्ही ठाकरे गटासोबतच आहोत. येणाऱ्या बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरे गटासोबत जाण्याची आमची मानसिकता असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.

हेही वाचाः ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

मागील सहा महिन्यामध्ये परिस्थिती बदलल्याचं अजित पवार सांगायला विसरले नाहीत. चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक, बीएमसी निवडणूक आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

आघाडीबाबतचा पक्षांतर्गत निर्णय झालेला आहे. आता आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करुन पुढचा निर्णय घेण्यात येईल, असं पवार म्हणाले. अंतिम निर्णय पक्षातील वरिष्ठ घेतील, असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, काल प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंचा गट यांची युती झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर पक्ष नाराज असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS इतका भ्रष्टाचारी, ७.५ कोटी एका दिवसात नाही आले; व्यवस्था झोपलेली का? राज्यपालांचा संतप्त सवाल

Latest Marathi News Live Update : गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग

Kolhapur Roads : कोल्हापुरातील रस्ते बादचं! सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका; ७७ रस्त्यांच्या सर्व्हेद्वारे २३९ पानी मुद्दे

Panchang 18 October 2025: आजच्या दिवशी मारुती स्तोत्र व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

“चित्रपटाचा बजेट–कमाई जाणून घ्यायचं प्रेक्षकांचं काम नाही” – दिग्दर्शक अनुभव सिन्हा

SCROLL FOR NEXT