Maharashtr Mansoon Update  google
महाराष्ट्र बातम्या

राज्यात मान्सूनपूर्व सरी; २४ तासांत सातारा, बीडमध्ये हलका पाऊस

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढचा वेग मंदावण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढचा वेग मंदावण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

दोन दिवसांपूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. यंदा वेळेआधी मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांची शेतीकामाची धांदल सुरु झाली आहे. जुनच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये सातारा, बीड या जिल्ह्यांत मान्सून पूर्व सरी बरसल्या असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीये. (Maharashtr Mansoon Update)

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर त्याच्या पुढचा वेग मंदावण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळं पुढील दोन आठवडे मान्सूचा वेग कमी राहू शकतो. मात्र, मान्सूनचा वेग कायम राहिल्यास मान्सून तळकोकणात ४ ते ५ जूनपर्यंत पोहोचू शकतो असंही सांगण्यात आलं आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे मान्सूनच्या आगमनाचे सर्व निकष पूर्ण झाले असल्याने तो वेळेत हजेरी लावण्याची शक्यता आहे.

दरम्यान, श्रीलंकेच्या वेशीवर काही दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला होता पण मान्सून केरळात दाखल झाला असून आता तो महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीप्रमाणे यंदा नैऋत्य मान्सून हा सामान्य असणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी 868.6 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आयएमडीने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 1971-2020 या कालावधीसाठी 87 सेंटीमीटरच्या दीर्घ काळ सरासरीच्या (LPA) 96 ते 104 टक्के पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे संपूर्ण भारतातील पडणारा वार्षिक सामान्य पाऊस यावर्षी पूर्वीच्या 1176.9 मिमीच्या तुलनेत आता 1160.1 मिमी असणार आहे. दरम्यान, पुढील काही दिवस राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरणही राहण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Kashish Fulwaria: भाजपची सर्वात तरुण नगरसेविका कशिश फुलवारीया कोण? वयाच्या २२व्या वर्षी मुंबई महापालिकेत विजय

CM Devendra Fadnavis: पुण्याची जनताच दादा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपच्या नेत्यांना स्वीकारले!

Republic Day security : दिल्लीसह अनेक शहरांत प्रजासत्ताक दिनाआधी बांगलादेशी दहशतवादी संघटनाचा घातपाताचा कट, अलर्ट जारी

Chardham Yatra: नव्या वर्षात बदरी-केदारसह चारी धामांमध्ये मोबाईल नेण्यास बंदी; रीलवर प्रशासनाची कडक 'नजर'

Latest Marathi Live Update: मतदारांना धमकी दिल्याचा आरोप प्रकरणात सिल्लोड न्यायालयाची अब्दुल सत्तारांना नोटीस

SCROLL FOR NEXT