Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: हिवाळी अधिवेशनापूर्वीच काँग्रेसमधील बडा नेता करणार पक्षांतर, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्याचा दावा

A big leader in Congress will switch sides: राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत आहे. अशातच भाजप नेते आशिष देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आशिष देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 'आतापर्यंत राज्याच्या अनेक विरोधी पक्षनेत्यांनी पक्षांतर केलेलं आहे. आताचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील लवकरच पक्षांतर करतील', असं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आशिष देशमुख म्हणाले की, 'आतापर्यंत राज्याच्या अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी पक्षांतर केलेलं आहे, आत्ताचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार देखील लवकरच पक्षांतर करतील. हिवाळी अधिवेशनापूर्वी विजय वडेट्टीवार पक्षांतर करतील’ असा दावा आशिष देशमुखांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, 'महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता पक्षांतर करतो ही परंपरा सुरूच आहे. आधी एकनाथ शिंदे हे पक्षातून बाहेर पडले, त्यानंतर अजित पवार, आता विजय वडेट्टीवार देखील त्याच मार्गवर असल्याचं देशमुखांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत

राज्यातील काँग्रेसचे मोठे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

वडेट्टीवार म्हणाले, 'मी गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. मी सलग सहा वेळा आमदार झालोय. कधीच पराभूत झालो नाही. यासाठी तुम्हाला चांगला वक्ता व्हावं लागेल. राजकारणात चांगला वक्ता होणं खूप गरजेचं आहे. राहुल गांधी उच्चशिक्षित आहेत. परंतु ते चांगले वक्ते नाहीत. त्यामुळे तुम्ही चांगले वक्ते व्हा. तुम्हाला लोकांसमोर बोलता आलं पाहिजे. लोकांशी जोडण्यासाठी उदाहरणं देऊन बोललं पाहिजे', असं वडेट्टीवार म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT