Prafull Patel  
महाराष्ट्र बातम्या

Mahayuti Update : महायुतीमधील तिन्ही पक्षात चांगला समन्वय; मतभेदाच्या चर्चांना प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

Nagpur News - राज्य सरकारमधील एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटात मतभेद असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा बैठका अजित पवार घेत असल्याचं समोर आलं होतं. त्यावरून देखील शिंदे गट आणि अजित पवार यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. आता यावर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक विभागाची माहिती घेण्याचा, बैठक घेण्याचा आणि योग्य रीतीने निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यात काहीही चूक नाही.

दरम्यान आमच्या महायुतीमध्ये तिन्ही घटक पक्षात चांगला समन्वय आहे. प्रत्येक गोष्टीत एकमेकांशी संवाद साधून आम्ही निर्णय घेत असतो. यात कोणी उगाच वादावादी लावायचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचं आहे, त्यात तथ्य नाही, असं पटेल यांनी नमूद केलं.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेवर पटेल म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा. वडेट्टीवार यांची प्रगती झाली आहे. सप्टेंबरमध्ये सरकार पडणार आहे असं ते म्हणत असतील तर त्यावर मला पाणी फेरायचं नाही, सगळ्यांना शुभेच्छा.

चांद्रयान मोहिमेवर पटेल म्हणाले की, चांद्रयान तीनचे चंद्रावर लँडिंग होणार आहे, भारतासाठी आज गौरवाचा, अभिमानाचा दिवस आहे. भारताची प्रतिभा किती शक्तिशाली आहे हे आज सगळ्यांना दिसेल. देशातील सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन.

(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

Manoj Jarange Patil: मध्यरात्री अंतरवालीत घडलं मोठं नाट्य; सरकार-जरांगे चर्चेचा निकाल काय? जाणून घ्या आतली माहिती

'या' अभिनेत्रीच्या तोंडाचा येत होता वास, बॉबी देओलने किसिंग सीन देण्यास दिला स्पष्ट नकार, नक्की काय घडलेलं?

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

SCROLL FOR NEXT