Bhagat Singh Koshyari on st worker protest infront of sharad pawar house rak94 Sakal media
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांच्या घरावर हल्ला प्रकरणी राज्यपालांची प्रतिक्रिया, म्हणाले…

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन सध्या राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणी भाजपाच्या अनेक नेत्यांनी या आंदोलनाचा निषेध केला आहे, यादरम्यान राज्याचे राज्यपाल भगतसींग कोश्यारी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

पवारांच्या घरावर झालेला हल्ला निंदनीय असल्याची प्रतिक्रिया राज्याचे राज्यपाल भगतसींग कोश्यारी यांनी दिली. पुढे बोलताना अशा प्रकारची घटना कधीही होऊ नये असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले आहेत. ते म्हणाले की मु्ख्यमंत्री जे हे प्रकरण हाताळत आहेत ते समजदार व्यक्ती आहेत, स्वतः शरद पवार हे देखील प्रतिष्ठित नेता आहेत, त्यामुळे अशा प्रकारच्या घटनेला कोणीही चांगलं म्हणणार नाही अशा प्रकारची घटना होऊ नये असे मला वाटतं असे त्यांनी यावेळी सांगितलं.

एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया देत म्हटले होते की, राष्ट्रवादी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. तसेच चुकीच्या नेतृत्त्वाखाली पाठीशी नाही, नेता चुकीचा असेल तर, त्याचा परिणाम काय होतो, ते आज दिसंल असेदेखील पवार यांनी गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला होता. तर गृह विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांना भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी सदावर्तें यांच्यासह १०४ जणांना अटक झाली. त्यानंतर सकाळी सदावर्तेंना मुंबईच्या किला कोर्टात हजर करण्यात आलं.तसेच त्यांना राज्य सरकारच्या वतीेने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT