महाराष्ट्र बातम्या

Jagtap Vs Fadnavis: तुमचंही नाव भाई! भिडे गुरुजींच्या नावावरून फडणवीसांचा जगतापांना टोला

संभाजी भिडे यांच्यामुद्द्यावरुन आज विधानपरिषदेत देखील विरोधकांनी गोंधळ घातला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Mumbai News : संभाजी भिडे यांच्यामुद्द्यावरुन आज विधानपरिषदेत देखील विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. फडणवीसांनी जगताप यांना टोला लगावला यामुळं सभागृहात हशा पिकला. त्यानंतर जगताप यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं. (Bhai Jagtap Vs Devendra Fadnavis clashes in Vidhan Parishad over Sambhaji Bhide)

फडणवीस म्हणाले, "भिडे गुरुजी यांनी पुस्तक वाचायला सांगितलं होतं. 'द कुराण' आणि 'फकीर' 192 पानाच्या पुस्तकात 20 व्या प्रकरणात हा वादग्रस्त भाग आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी 2 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे" (Latest Marathi News)

फडणवीस पुढे म्हणाले, "भाई जगताप तुम्ही म्हणतात म्हणून सर्व सत्य नसतं. त्याचं नाव मनोहर कुलकर्णी आहे. आम्हाला भाई जगताप हेच नाव माहिती आहे. मग आम्ही यावर प्रश्न विचारायचा का? तुमचंही नाव भाई आहे, आम्ही तुम्हाला भाई म्हणूनच ओळखतो. भाई जगताप हे रजिस्टर नाव आहे पण तुम्ही भाईगिरी करत नाही" या विधानानंतर सभागृहात हशा पिकला. (Marathi Tajya Batmya)

नंतर फडणवीसांच्या या विधानावर भाई जगताप म्हणाले, "माझं रजिस्टर नाव भाई आहे मी वैचारिक भाई आहे. त्यामुळं मी भाईगिरी करत नसलो तरी वैचारिक भाईगिरी करत राहणार"

दरम्यान, भिडेंच्या व्हॉईस क्लीप तपासण्यात येणार असल्याचंही यावेळी फडणवीस म्हणाले. भिडे गुरुजी बहुजन समाजाला आणि तरुणांना जोडण्याचं काम करत असतात. पण त्यांना महापुरुषांवर कमेंट करण्याचा अधिकार नाही. वीर सावरकर यांच्याबाबत देखील ज्यांनी लिहिलं आणि बोललं त्यांच्याबाबत कारवाई करण्यात येईल, 'शिदोरी' या काँग्रेसच्या मुखपत्रावर कारवाई करण्यात येईल, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT