esakal

महाराष्ट्र बातम्या

Students Overdose Incident : गोळ्यांचा ओव्हरडोज; शिक्षक, मुख्याध्यापक निलंबित; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

shocking overdose incident in a Zilla Parishad : अ‍ॅनिमियामुक्त भारत अभियानाच्या अनुशंगाने चंद्रपूरमधील भामडेळीतील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना देण्यासाठी गोळ्या प्राप्त झाल्या होत्या.

Mayur Ratnaparkhe

Students at Bhamdeli Zilla Parishad School affected after overdose : फॉलिक ॲसिड, आयरनच्या पाच ते सात गोळ्या एकाचवेळी खालल्याने चंद्रपूरमधील भामडेळी येथील जिल्हा परिषद शाळेतील १९ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली होती. हा प्रकार शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकाच्या निष्काळजीपणा घडल्याचे आता समोर आले आहे. याची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गंभीर दखल घेत प्रभारी मुख्याध्यापक बापूजी थेरे, शिक्षक राजू घोडमारे यांना निलंबित केले आहे. निलंबन काळात बापूजी थेरे जिवती पंचायत समिती तर राजू घोडमारे यांना गोंडपिंपरी पंचायत समितीत सेवा देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

आरोग्य विभागाच्या माध्यमातून अ‍ॅनिमियामुक्त भारत अभियान राबविले जात आहे. अभियानाअंतर्गत रक्त वाढीसाठी जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद शाळांतील दोन वर्षांवरील विद्यार्थ्यांना फॅाालिक अॅसिड आणि आयरनच्या गोळ्यांचे वितरण करण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही गोळ्या आठवड्यातून एकदाच खायच्या आहेत. त्याबाबात शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांना आरोग्य विभागाने तशा सूचना दिल्या आहेत. भद्रावती तालुक्यातील भामडेळी येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. पहिली ते चौथीचे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत.

अ‍ॅनिमियामुक्त भारत अभियानाच्या अनुशंगाने भामडेळीतील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना देण्यासाठी गोळ्या प्राप्त झाल्या होत्या. गेल्या १० फेब्रुवारी रोजी शाळेच्या सत्रात दोन वर्षांवरील मुलांना फॅाालिक अॅसिड आणि आयरन गोळ्यांचे वाटप करण्यात आले. वास्तविक पाहता या दोन्ही गोळ्या आठवड्यातून एकदाच घ्यायच्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना त्याचे वितरण करण्यात आले. मात्र, काही विद्यार्थ्यांनी शाळेत तर काही विद्यार्थ्यांनी रात्री घरी पाच ते सात गोळ्या एकाचवेळी खालल्या. गोळ्यांची मात्रा अधिक झाल्याने १९ विद्यार्थ्यांची प्रकृती रात्री बिघडली. त्यांना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचाराअंती दुसऱ्या दिवशी सर्वच विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान, या गंभीर प्रकाराची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविली होती. त्या अनुशंगाने शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी भद्रावती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश महाकाळकर यांना सूचना देत अहवाल मागितला होता. अहवाल प्राप्त झाल्यावर शिक्षण विभागाने शाळेचे प्रभारी मुख्याध्यावपक बापूजी थेरे, शिक्षक राजू घोडमारे यांना निलंबित केले.

१९ विद्यार्थ्यांची प्रकृती -

गोळ्यांची मात्रा अधिक घेतल्याने भामडेळी येथील १९ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली होती. याप्रकरणाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली होती. अहवाल मागविण्यात आला होता. त्यात निष्काळजीपणा समोर आला. मुख्याध्यापक आणि शिक्षकास निलंबित करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT