Bharat Gogawale Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bharat Gogawale : राऊत तुम्ही बोलत राहा; तुमच्या बोलण्यानेच...; गोगावलेंचं सूचक वक्तव्य

पक्ष चिन्ह आणि शिवसेना नाव शिंदे गटाला मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bharat Gogawale : निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह आणि शिवसेना नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

हेही वाचा : स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

त्यानंतर आज शिंदे गटाकडून शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयाचा ताबा घेण्यात आला आहे. यानंतर आता शिंदे गटाकडून पक्ष निधीवरदेखील दावा केला जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पक्ष निधी हा वेगळा मुद्दा असल्याचे सांगत आम्ही पायरी पायरीने चढाई करण्यास सुरू केली असून, एकदम कळसाला हात लावणार नाही, असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केले आहे. घाईगडबडीत काहीच करणार नसल्याचेही यावेळी गोगावलेंनी स्पष्ट केले.

जे काही केले जाईल ते पायरी पायरी चढूनच केले जाईल. चुकीचं काही करणार नाही तसेच कुणी अडचणीत येईल असे कोणतेही काम करणार नसल्याचेदेखील गोगावले यांनी स्पष्ट केले आहे.

गोगावले म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच आम्ही विधिमंडळातील शिवसेनेचं विधिमंडळाचं कार्यालयात प्रवेश केला आहे. यावेळी आगामी काळातील होणाऱ्या अधिवेशनावर चर्चा केल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासंदर्भात व्हीप अद्याप काढलेला नाही. परंतु, नियमाप्रमाणे तो काढावा लागतो आणि तो काढला जाईल असेही गोगावले यांनी यावेळी स्पष्ट केले.

काढण्यात येणारा हा व्हीप ठाकरे गटातील आमदारांनादेखील लागू असेल, जर त्यांनी हा व्हीप स्वीकारला नाही तर, त्यांच्यावर नियमांनुसार चर्चा करून कारवाई केली जाईल. निलंबन लगेच केले जाईल की नाही हे आता सांगता येणार नाही, पण अशा प्रकारची कारवाई विचाराधीन राहील असे ते म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल अशी शक्यता निर्माण झाल्याचे गोगावले यांनी म्हटले आहे. यामुळे राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

यावेळी त्यांनी संजय राऊत करत असलेल्या टीकेवरही भाष्य केले, ते म्हणाले की, संजय उद्धव ठाकरेंना संपवण्याचे चांगलं काम राऊत करत आहे. त्याचं हे काम आम्हाला फायद्याचं ठरत चाललं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT