Bharat Gogawle and Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

उरलेल्या भाकरीतही वाटा द्यायला तयार; खळबजनक गौप्यस्फोटावर गोगावलेंची गंमतीदार सारवासारव

रवींद्र देशमुख

मुंबई - शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानामुळे राजकणात खळबळ उडाली होती. त्यावर सर्वच नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र आता भरत गोगावले यांनी आपल्या गौप्यस्फोटावर सारवासारव केली आहे. तसेच सारवासारव करताना पुन्हा गंमतीदार विधान केलं आहे.

भरत गोगावले एका कार्यक्रमात म्हणाले होते की, मंत्रीपदासाठी माझाच नंबर पहिला होता. मात्र तीन आमदारांनी फार हट्ट केला. एक म्हणाला होता की, मला मंत्रिपद मिळालं नाही, माझी बायको आत्महत्या करेल, दुसरा म्हणाला होता मला जीव द्यावा लागेल, तर तिसरा म्हणाला होता, मला नारायणे संपून टाकतील. त्यामुळे मी मागे थांबलो होतो.

गोगावले यांच्या विधानावर शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. तर विरोधकांनी यावरून सरकारवर निशाणा साधाला होता.मात्र आता भरत गोगावले यांनी सारवासारव केली आहे. गोगावले म्हणाले की, मी अजिबात नाराज नाहीये. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला समज दिली आहे. आम्ही तर उरलेल्या भाकरीत देखील वाटा द्यायला तयार आहोत.

याआधी देखील भरत गोगावले यांनी एक भाकर मिळायची तर अर्धी भाकर मिळेल. आर्धी मिळायची चतकोर मिळेल, असं म्हटलं होतं. त्यावरून देखील विरोधकांनी त्यांना लक्ष केलं होतं. आता त्यांनी उरलेल्या भाकरीतही आणखी कोणाला वाटा देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्याचा कारभार नेत्यांना मिळणाऱ्या भाकरीवर येऊ ठेपला की काय, असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT