Bharat Jodo 
महाराष्ट्र बातम्या

'भारत जोडो'त कोल्हापुरकरांचा 'नाद' खुळा! भगव्या फेट्यांसह पाच हजार कार्यकर्ते सामील

सकाळ डिजिटल टीम

- अतुल पाटील

हिंगोली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या 'भारत जोडो यात्रे'मध्ये शनिवारी (ता. १२) कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. भगव्या फेट्यांसह रस्त्यावरील दुतर्फा रांग असो कि, आखाडा बाळापुरमध्ये लाल मातीत रंगलेला कुस्त्यांचा फड असो. कोल्हापुरकरांनी हिंगोलीत जाऊन केलेले स्वागत 'नाद' खुळा असेच होते. अर्थातच, आजच्या दिवसाचे केंद्रबिंदू हाच प्रसंग ठरला. यावेळी शिवकालीन पारंपरिक खेळांनीही लक्ष वेधले.

भारत जोडो यात्रेच्या ६६ व्या दिवशी कळमनुरी तालुक्यातील दाती पाटी येथून यात्रा सुरु झाली. तासभराने यात्रा जेव्हा आखाडा बाळापुर याठिकाणी पोचली, तेव्हा खा. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी सहाशे किलोमीटर दुरवरुन आलेल्या कोल्हापूर येथील तब्बल पाच हजार कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. शनिवारी पहाटे साडेपाच वाजताच ते स्वागतस्थळी येऊन थांबले होते.

पदयात्रेत राहुल गांधी यांचे लक्ष कुस्तीच्या आखाड्याकडे गेल्यावर, सहाजिकच त्यांची पावले तिकडे वळली. झेड प्लस सुरक्षा व्यवस्था भेदून त्यांनी कोल्हापुरहून आलेल्या मल्लांना भेटले. राहुल गांधी यांच्या हस्ते एक कुस्ती लावण्यात आली. पैलवानांनीदेखील शड्डू ठोकत सुरवात केली. यावेळी कुस्तीतला प्रत्येक डाव ते निरखून पाहिला. त्यांच्या निरीक्षणाचेही कोल्हापूरकरांना अप्रुप वाटले. अडीच मिनीटांपेक्षा अधिक वेळ त्यांनी दिला.

खा. राहुल गांधी यांच्यासोबत कोल्हापुरकर आठ ते दहा किलोमीटर पदयात्रेत चालले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील, राजीव आवळे, ऋतुराज पाटील, पलुस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम, आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत भाग घेत चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT