महाराष्ट्र बातम्या

Bharat Jodo Yatra: आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत! 'भारत जोडो यात्रे'त लावली हजेरी

यापूर्वी अशा प्रकारचं दृश्य कधी दिसेल असं वाटलं नव्हतं, मात्र शक्य झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली : भारत जोडो यात्रेचा राज्यातील आज पाचवा दिवस असून ही यात्रा सध्या हिंगोलीतून जात आहे. विशेष म्हणजे आजच्या दिवशी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या यात्रेत हजेरी लावली. आदित्य ठाकरे यावेळी राहुल गांधींसोबत चालत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील आहेत. (Bharat Jodo Yatra Aditya Thackeray with Rahul Gandhi attended Bharat Jodo Yatra at Hingoli)

काँग्रेस हायकमांड असलेल्या राहुल गांधींसोबत पदयात्रेत शिवसेनेचे नेते सहभागी होतील असं यापूर्वी कधीही वाटलं नसेल पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सध्या अस्तित्वात आहे. यामध्ये काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. त्यामुळं सहाजिकचं राज्यातील राजकारणंही बदललं आहे. पण आता संपूर्ण भारत पादाक्रांत करण्यासाठी निघालेले राहुल गांधी यांना विविध राज्यांमधील विविध पक्षांचे नेते जॉईन होत आहेत.

राहुल गांधी या यात्रेमध्ये अनेक सामान्य लोकांना भेटत आहेत. थेट जनतेत जात असल्यानं त्यांना भेटण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर या यात्रेत सहभागी झालेले पहायला मिळत आहेत. राजकारण्यांसोबतच मनोरंजन, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी देखील राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रेत' सामिल होत आहेत.

या यात्रेत राज्यातील महाविकास आघाडीतील नेतेही सहभागी होत आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे देखील या यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा होती. पण त्यांच्याऐवजी आदित्य ठाकरे मात्र यात सहभागी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. खुद्द काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली होती. सुरुवातीला आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबरला यात्रेत सहभागी होतील असं सांगितलं जात होतं पण आज ते यात्रेत सहभागी झाले आहेत. कालच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; जनता वसाहत टीडीआर प्रकरणाला शासनाची स्थगिती

Miraj Minor Ganja : झटपट पैसे मिळवण्याचा नाद बेक्कार! मिसरुट न फुटलेली पोरंही गांजा विकताहेत; मिरजेत अल्पवयीनांकडून दोन किलो गांजा जप्त

Umesh Patil: स्वबळ ठरलेच तर शिवसेनेसह इतरांना सोबत घेऊ: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील; सामान्य नागरिक, कार्यकर्ता राष्ट्रवादीसोबतच..

Nilesh Ghaywal Case : निलेश घायवळ प्रकरणात आता ईडीची एन्ट्री; जमीन व्यवहारातील कोट्यवधींच्या उलाढालीचा तपास होण्याची शक्यता

Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेस सरकार संकटात? 'नोव्हेंबर क्रांती'च्या चर्चांना वेग, डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार?

SCROLL FOR NEXT