Chandrashekhar Bawankule and Rahul Gandhi 
महाराष्ट्र बातम्या

Bharat Jodo Yatra : चोरांना सगळे चोर दिसतात; काँग्रेसचं बावनकुळेंना चोख प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील भारत जोडा यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात यात्रा पोहोचली असून आता यात्रेवर टीका सुरू झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात्रेच्या खर्चबाबत खळबळजनक आरोप केले आहे. त्याला काँग्रेसकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जे भ्रष्टाचारी असतात, त्यांनाच भ्रष्टाचार दिसतो. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्याला आपल्या पक्षात घ्यायचं हा भाजपचा गोरखधंदा सर्वांना ठावूक आहे. भाजपवाले स्वत: भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देण्याचं कारणच नाही, असंही पटोले म्हणाले.

संजय निरुपम म्हणाले की, चोरांना सगळे चोरच दिसतात. भ्रष्टाचाऱ्यांना सगळे भ्रष्टाचारी दिसतात. गुजरातमधील मोरबी पुलाचं काय झालं. इंग्रजांनी बांधलेला पूल १६० वर्षात कोसळला नाही. गुजरात सरकारने रिपेरिंगला दिल्यानंतर कोसळला. पुलाच्या बांधणीसाठीच्या दोन कोटीपैकी केवळ १२ लाख रुपये खर्च कऱण्यात आला. हा भ्रष्टाचार कोणाचा, असा सवालही निरुपम यांनी केला.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर बावनकुळे म्हणाले होते की, मागील अडीच वर्षात भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा यात्रेत खर्च करण्यात येत आहे. शिवाय या यात्रेत नेत्यांचा मुलांचं लॉचिंग सुरू असल्याचंही राहूल यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT