महाराष्ट्र बातम्या

Bharat Gogawale : भरतशेठ प्रचंड आशावादी! म्हणाले, पालकमंत्रीपद माझ्यासाठी राखून ठेवलंय, फक्त...

संतोष कानडे

मुंबईः मागच्या चार महिन्यांपासून रखडलेला पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला आहे. राज्यातल्या १२ जिल्ह्यांना नवीन पालकमंत्री मिळालेले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणं काढून घेऊन त्यांच्याकडे अमरावती आणि सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय.

दुसरीकडे नाशिक, सातारा आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत सरकारने कुठलाही निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मागील अनेक महिन्यांपासून मंत्रिपदासाठी इच्छूक असलेले शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी मंत्रिपदासाठी अजूनही इच्छूक असल्याचं सांगून आशावाद व्यक्त केला आहे. 'ते टीव्ही ९ मराठी'शी बोलत होते.

भरत गोगावले म्हणाले की, रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे योग्य निर्णय घेतील. रायगड सध्या उदय सामंतांकडे आहे म्हणजे आमच्याकडेच आहे. त्यामुळे अचडणीची बाब नाहीये.

उदय सामंताकंडे पहिल्यापासूनच रायगडचं पालकमंत्रीपद आहे. जोपर्यंत आमची वर्णी लागत नाही तोपर्यंत पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे राहील.

गोगावले पुढे म्हणाले की, मंत्रिपदासाठी आमची धावपळ सुरुच आहे. योग्य वेळेला निर्णय होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे हे सोपवलेलं आहे. अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे. त्यामुळे ते रायगडचा दावा कशाला करतील? याबाबत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील.

''मी मंत्रीच झालो नाही तर पालकमंत्री कसा होणार? मंत्रिपद मिळेपर्यंत पालकमंत्रीपद राखून ठेवलेलं आहे. विचारविनिमय सुरु आहे. योग्य तेच घडेल.. नवरात्रीमध्ये देवीच्या मनात असेल तर तेच घडेल'' असं सूचक विधान भरत गोगावले यांनी केलेलं आहे.

माझ्यासाठीच पालकमंत्रीपदाबाबत निर्णय झाला नसून ते पद राखून ठेवलंय, अशा आशयाचं विधान भरत गोगावलेंनी केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP जॉइन करा अन् दर महिन्याला 50 हजार कमवा! असा मेसेज सगळीकडे का होतोय व्हायरल? यामागचा स्कॅम पाहून बसेल धक्का

Pune Riksha Fare: पुणेकरांना मोठा झटका! रिक्षाभाडेवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; लवकरच नवे दर हाेणार लागू

Almatti Dam Controversy : आलमट्टीच्या उंचीवरून कर्नाटकची मनमानी! महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; तज्ज्ञांचं आवाहन, काय म्हणाले केंगार?

Latest Marathi News Live Update : पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात

Child Murder Case: एआयच्या मदतीने चिमुकल्याची हत्या! बिश्नोई गँगच्या नावाने १९९ रुपयांत सिमकार्ड खरेदी; कसा रचला भयानक कट?

SCROLL FOR NEXT