Bhiwandi Building Collapsed esakal
महाराष्ट्र बातम्या

Bhiwandi Building Collapsed : भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 3 वर; बचावकार्य सुरुच

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मुंबईजवळ भिवंडी येथे आज दुपारी इमारत कोसळली आहे. सायंकाळपर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येत होती. आता मृतांचा आकडा वाढलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून मदतदेखील जाहीर केलीय.

भिवंडीतील मौजे कैलासनगर येथे आज दुपारी इमारत कोसळल्याची घटना घडली. अजूनही बचावकार्य सुरु असून आतापर्यंत तीन जण मृत झाल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत TDRF NDRF च्या जवानांनी ९ जणांना सुखरुप बाहेर काढलं आहे. आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांनी हे बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावं तसेच जखमींना तत्काळ रुग्णालयांमध्ये हलवून उपचार सुरू करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. ठाणे आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमकडूनही घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

Cristiano Ronaldo : भावनिक क्षण! ख्रिस्तियानो रोनाल्डो रडला... मैदानावर एकटा उभा राहिला; फुटबॉलविश्व स्तब्ध Video

Portugal vs Spain : स्वप्न तुटले! ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड कप प्रवास संपला! पोर्तुगालला माजी विजेत्या स्पेनकडून पराभवाचा धक्का

LPG import updates: 'एलपीजी'बाबत सरकारने प्लॅन बदलला! अमेरिकेसोबत मोठा निर्णय, गॅसचं संकट टळणार

Pune Heavy Rain : पावसाने दाणादाण! जनजीवन विस्कळित, घरांसह दुकानांमध्ये शिरले पाणी

SCROLL FOR NEXT