Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : शिंदे गटाचा मनसेलाही धक्का! 'या' नेत्याने सोडली 15 वर्षाची साथ

राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गट, यांच्यासह आता मनसेलाही शिंदे गटाने खिंडार पाडलं

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसात राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. शिवसेनेत दोन गट पडले त्यानंतर एकनाथ शिंदे आणि समर्थक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे गटाने सर्वच पक्षांना धक्का दिला आहे. अनेक आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते सातत्याने शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत.

राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गट, यांच्यासह आता मनसेलाही शिंदे गटाने खिंडार पाडलं आहे. रायगड जिल्ह्यातील मनसेचे पेण तालुका अध्यक्ष रुपेश पाटील हे आपल्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह लवकरच शिवसेनाच्या शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. रुपेश पाटील हे गेल्या १५ वर्षांपासून मनसेमध्ये सक्रिय आहेत.

पक्षांतर्गत गटबाजीमुळे मनसेतील अनेक नेते, पदाधिकारी पक्ष सोडत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. गेल्या काही वर्षांपासून मनसे मधील अंतर्गत गटबाजी ही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक आमदार,नगरसेवक आणि महत्वाचे पदाधिकारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. दरम्यान याच कारणामुळे रुपेश पाटील हे देखील लवकरच पक्ष बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT