Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शिंदे गटानंतर आता काँग्रेसचा राष्ट्रवादीला धक्का, 91 जणांनी सोडली घड्याळाची साथ

आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थित 91 जणांनी काँग्रेसमध्ये केला प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीला एकीकडे ठाण्यात मोठं खिंडार पडलं आहे. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीतून शिवसेनेच्या शिंदे गटात अनेक नगरसेवक, आजी माजी नगरसेवक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. अशातच आता महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या काँग्रेसने राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

पुणे जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली गळती राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद वाढल्याचे दिसून येणार आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपुर्वी माजी राज्यमंत्री विजयबाप्पू शिवतारे यांच्या नेतृत्वात बारामती लोकसभा इंदापूर तालुका, करमाळा सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटातील असंख्य पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुण्याच्या भोर तालुक्यात भावेखल येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थित आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्त्यांसह 91 जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश करण्याऱ्यांमध्ये बहुतांश जण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहे.

एकीकडे ठाण्यामध्ये राष्ट्रवादीला शिंदे गटाने मोठं खिंडार पाडलं आहे. तर दुसरीकडे मित्रपक्षात जाणाऱ्यां कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतल अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर आता भोर तालुक्यातून राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : लालबागच्या राजाचं 24 तासांनंतर विसर्जन, भाविकांचे पाणावले डोळे; समुद्रकिनारी मोठी गर्दी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT