Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session: अधिवेशनाआधी मंत्रिमंडळात मोठा बदल, CM शिंदेंकडे असलेली खाती तात्पुरती इतर मंत्र्यांकडे कारण...

Monsoon Adhiveshan 2023 : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

Maharashtra Political News : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (१७ जुलै) सुरू होत आहे. अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, युती सरकारचा विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. यादरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे.

आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचा तात्पुरता भार शिंदे गटातील इतर मंत्र्यावर सोपवला आहे.

अधिवेशनाच्या कालावधीत विधानसभा आणि विधानपरिषदेत या खात्याच्या येणाऱ्या संबंधित प्रश्नावर हे मंत्री उत्तर देतील. मंत्री मंडळ विस्तार आणि खाते वाटप झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जी खाती होती त्याचा तात्पुरता भार संबंधित मंत्र्यांवर दिला आहे. (Latest Marathi News)

कोणाकडे कोणते खातं?

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली काही खाती इतर मंत्र्यांना देण्यात आली. त्यात गुलाबराव पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, उदय सामंत यांच्याकडे नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, शंभूराज देसाईंकडे सामाजिक न्याय आणि दिव्यांग, दादा भूसे यांना परिवहन, अब्दुल सत्तारांकडे खनिकर्म आणि दीपक केसरकर यांच्याकडे परिवहन खातं देण्यात आलं आहे.(Latest Marathi News)

पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मंत्रिपदासाठी भाजप तसेच शिंदे गटातील आमदार उत्सुक होते. मात्र, अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समावेश झाला.

त्यानंतर पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर या मंत्र्यांच्या खातेवाटपावरून युती सरकारमध्ये रस्सीखेच सुरू झाली.(Latest Marathi News)

दरम्यान खातेवाटप झालं, पण मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र लांबणीवर पडला. आता पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT