Nagpur News

 

Sakal

महाराष्ट्र बातम्या

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

संशयित आरोपी राहुल व त्याच्या पत्नीत घरगुती वाद होत असल्याने तो पत्नीस नांदायला घेऊन जात नव्हता. त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध नांदण्यास घेऊन जाण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. ९ ऑगस्ट रोजी पोपळी गावात यात्रा असल्याने राहुलचे सासू-सासरे व त्याची तीन वर्षांची लहान मुलगी तेथे गेले होते. त्यावेळी राहुलने त्यांना शिवीगाळ करून सासूचा विनयभंग केला, अशी फिर्याद राहुलच्या सासूने मोहोळ पोलिसांत दिली होती.

तात्या लांडगे

सोलापूर : कोल्हापूर बेंचने राहुल दाजी लांडगे (वय ३३, रा. सावळेश्वर, ता. मोहोळ) यास मोहोळ पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर ठरविली आहे. त्यास तत्काळ सोडण्याचे आदेश न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक व शर्मिला देशमुख यांनी दिले आहेत.

संशयित आरोपी राहुल व त्याच्या पत्नीत घरगुती वाद होत असल्याने तो पत्नीस नांदायला घेऊन जात नव्हता. त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध नांदण्यास घेऊन जाण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. ९ ऑगस्ट रोजी पोपळी गावात यात्रा असल्याने राहुलचे सासू-सासरे व त्याची तीन वर्षांची लहान मुलगी तेथे गेले होते. त्यावेळी राहुलने त्यांना शिवीगाळ करून सासूचा विनयभंग केला, अशी फिर्याद राहुलच्या सासूने मोहोळ पोलिसांत दिली होती. त्यावरून मोहोळ पोलिसांनी राहुलला १२ ऑगस्ट रोजी तपास अधिकाऱ्यांपुढे हजर राहण्यासाठी नोटीस दिली होती. त्याप्रमाणे राहुलने तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून बंदपत्र व चांगल्या वागणुकीचा बाँड व जामीन देखील दिला होता.

राहुलने त्याच्या सासरच्या मंडळींविरुद्ध ऑनलाइन फिर्याद दिली होती. फिर्यादीची शहानिशा करण्यासाठी राहुलला पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी ठाण्यात बोलविले होते. त्याच्या सासूने दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलिसांनी राहुलच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. परंतु, अटक बेकायदेशीर असल्याचा अर्ज राहुलच्या वकिलांनी मोहोळ कोर्टात दिला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला आणि त्यास न्यायालयीन कोठडी ठोठावली होती.

उच्च न्यायालयात वकिलांचा असा युक्तिवाद

संशयित आरोपी राहुल लांडगे याने ॲड. रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकेच्या सुनावणीवेळी ॲड. थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात अटक करण्याचे मूलभूत मुद्दे पोलिसांनी आरोपीला सांगणे गरजेचे आहे, त्यामुळे तो स्वतःचा बचाव व जामीन करू शकेल. तसेच पोलिसांनी आरोपीच्या अटकेची दिलेली सूची अस्पष्ट व सामान्य आहे. ती कायदेशीर नसल्याचा युक्तिवाद मांडला. त्या पृष्ठयार्थ उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. त्यावर बेंचने पोलिसांनी दिलेली अटकेची कारणे सबळ नसल्याचे नमूद करून अटक बेकायदेशीर ठरवली. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांचा रिमांड हुकूम रद्द करून आरोपीस कारागृहातून तत्काळ सोडण्याचे आदेश दिला. यात संशयितातर्फे ॲड. थोबडे, ॲड. इरफान पाटील, ॲड. वसीम शेख यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

Delhi Blast: खोली भाड्याने घेऊन साठवलं होतं बॉम्ब बनवण्याचं साहित्य; काही तासांपूर्वीच ३०० किलो आरडीएक्स जप्त, दिल्ली स्फोटाशी काय कनेक्शन?

Delhi Red Fort blast Live Update : पंतप्रधान मोदींनी दिल्ली स्फोटात मृत्यू झालेल्यांबाबत व्यक्त केला शोक

Delhi Bomb Blast Fire Officer Video : दिल्ली स्फोटाच्या घटनास्थळी सर्वात पहिल्यांदा पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं

Delhi Blast Update : तीन वेळा जमिनीवर आपटलो, दूरपर्यंत आगीच्या ज्वाळा... दिल्ली स्पोटातील प्रत्यक्षदर्शींने सांगितला हादरवणारा प्रसंग

SCROLL FOR NEXT