पाण्याखाली राहिल्याने अनेक पिकांची माती झाली.

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! सरसकटऐवजी अटींवर बोट ठेवून नुकसानीचे पंचनामे; उसाच्या भरपाईसाठी पूर्ण पीक पाण्याखाली असण्याची अट; दिवाळीपूर्वी मदत देण्यासाठी लगबग

अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्यांना सरसकट मदत दिली जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारने दिली. मात्र, पाच दिवस ऊस व फळ बागांच्या शेंड्यापर्यंत पाणी असेल तरच त्या पिकांचे नुकसान होते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नदीकाठ वगळता अन्य ठिकाणी उसाचे नुकसान झाले नाही समजून पंचनामे करण्यात आले आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्यांना सरसकट मदत दिली जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारने दिली. मात्र, पाच दिवस ऊस व फळ बागांच्या शेंड्यापर्यंत पाणी असेल तरच त्या पिकांचे नुकसान होते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नदीकाठ वगळता अन्य ठिकाणी उसाचे नुकसान झाले नाही समजून पंचनामे करण्यात आले आहेत. फळबागांचे नुकसान जागेवर जाऊन पाहण्यात आले.

राज्य सरकारने अतिवृष्टी व महापुरामुळे ५५० पेक्षा जास्त तालुक्यांमधील ४७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल आहे. मात्र, ऊस व फळबागांच्या क्षेत्राचे पंचनामे अटींवर बोट ठेवून केले आहेत. फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करताना बागा भविष्यात व्यवस्थिती येतील की नाही, हे न पहाता सध्या बाग बहारात होती का, ही बाब पाहिली जात आहे.

अतिवृष्टी, महापुरामुळे पंचनामे करायला त्याठिकाणी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे नुकसनीच्या फोटोची अट शिथील करण्यात आली. मात्र, आता पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांना फोटो घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे अनेकजण भरपाईपासून वंचित राहतील, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

आज सरकारला जाणार अंतिम अहवाल

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे झाले, त्यांना बॅंक पासबूक व उताऱ्यावरील गट क्रमांक देण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यासाठी खासगी कर्मचारी नेमून कागदपत्रे घेतली जात आहेत. त्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या म्हणजेच अंतिम पंचनामा अहवाल सोमवार किंवा मंगळवारी सरकारला पाठविला जाणार आहे. दिवाळीपूर्वी प्रत्येकाच्या खात्यात भरपाई जमा करण्याच्या दृष्टीने सरकार पातळीवरून तसे आदेश देण्यात आले आहेत.

तहसीलदार म्हणतात...

तहसीलदार म्हणतात, ‘कृषी शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार अतिवृष्टीमुळे उसाचे नुकसान होत नाही, उलट उसाला पाण्याची गरज असते. पण, पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस ऊस किंवा फळबागा पाण्याखाली असतील तर नुकसान होते. त्या पिकातून पाच-दहा दिवस पाणी साचले किंवा वाहिल्यास वाढ खुंटून उत्पन्नात काही प्रमाणात घट होऊ शकते. त्यामुळे आम्ही अशी स्थिती कोणत्या शेतकऱ्यांची झाली आहे, याची खात्री करून पंचनामे केले आहेत’.

दिवाळीपूर्वी मिळेल बाधितांना भरपाई

अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, हा सरसकट पंचनाम्याचा अर्थ आहे. सरसकट सगळ्यांनाच मदत द्यायची असेल तर पंचनामे कशाला लागतात. दोन दिवसांत सोलापूर जिल्ह्याचा पंचनाम्याचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर होईल. दिवाळीपूर्वी बाधितांना भरपाई मिळावी हा हेतू आहे.

- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Municipality: एससी-एसटींसाठी नवे प्रभाग! महापालिकेसाठी फेररचना; जुन्या राखीव वॉर्डांमध्ये बदल

'हे असला फालतूपणा' जान्हवी जयंतपासून स्वत:ची सुटका करुन घेणार, लक्ष्मी निवासचा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...'संपवण्यापेक्षा...'

Latest Marathi News Live Update: कृषी उत्पन्न बाजार समितीममध्ये लसणाची आवक घटल्याने दरामध्ये वाढ होण्यास सुरुवात

ICC Womens World Cup : ३३० धावा करूनही हरल्या, स्पर्धेबाहेर जाण्याचे संकट... कर्णधार हरमनप्रीत कौरने कोणावर फोडले खापर?

Sangli News: कवलापूरला विमानतळ करा; मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पृथ्वीराज पाटील यांच्याकडून साकडे

SCROLL FOR NEXT