zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता मुख्याध्यापकांचीच ‘परीक्षा’; शिक्षण संचालकांनी तातडीने मागविली माहिती, शाळांमध्ये नसलेल्या बाबींची उत्तरेही ‘हो’मध्येच

राज्य शासनाने १३ मे २०२५ रोजी काढलेल्या निर्णयानुसार, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेसंदर्भातील माहिती मागितली आहे. त्यानुसार २५ सप्टेंबरला शिक्षण संचालकांनी मुख्याध्यापकांना आदेश काढून २९ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली. मात्र, पोर्टलच सुरू न झाल्याने अनेक शाळांना माहिती भरता आलेली नाही.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती शिक्षण संचालकांनी तातडीने मागितली आहे. त्यासाठी ६० मुद्दे दिले असून, त्यासंदर्भात मुख्याध्यापकांनी एक नमुना तयार केला आहे. उच्च न्यायालयात ही माहिती सादर केली जाणार असल्याने, शिक्षण संचालकांनी २९ सप्टेंबरपर्यंतच मुदत दिली होती, पण सर्व्हर डाउनमुळे ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. अनेक मुख्याध्यापकांनी शाळेत नसलेल्या बाबींची देखील उत्तरे ‘हो’ म्हणून पाठविली आहेत.

राज्य शासनाने १३ मे २०२५ रोजी काढलेल्या निर्णयानुसार, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेसंदर्भातील माहिती मागितली आहे. त्यानुसार २५ सप्टेंबरला शिक्षण संचालकांनी मुख्याध्यापकांना आदेश काढून २९ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली. मात्र, पोर्टलच सुरू न झाल्याने अनेक शाळांना माहिती भरता आलेली नाही.

काही मुख्याध्यापकांनी शाळांमधील कर्मचारी संख्या वगळता उर्वरित मुद्द्यांची उत्तरे तयार करून एकमेकांना पाठवून दिली आहेत. दुसरीकडे, सर्व्हर डाउन असल्याने सोमवारी (ता. २९) अनेक शाळांना माहिती भरता आलेली नाही. त्यांना सर्व्हर सुरू झाल्यावर माहिती भरता येणार आहे, पण शाळांनी भरलेल्या माहितीची फेरपडताळणी होणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना वस्तुनिष्ठ माहिती भरावी लागणार आहे.

...तर संबंधित मुख्याध्यापकांवर होईल कारवाई

उच्च न्यायालयाने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील माहिती मागविली आहे. त्यानुसार शाळांनी वेळेत माहिती देणे अपेक्षित आहे. शाळांनी त्यांच्याकडे असलेल्या व नसलेल्या बाबी वस्तुनिष्ठपणे नोंदवाव्यात. फेरपडताळणीत चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाईल.

- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सुरक्षेसंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे...

  • विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेसंदर्भातील १३ मे २०२५ चा शासन निर्णय सर्व पालकांपर्यंत पोचविला आहे का?

  • चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ हा टोल फ्री क्रमांक शाळेच्या दर्शनी भागात लावला आहे का?

  • विद्यार्थ्यांची सकाळी, दुपारच्या वेळेस हजेरी नोंदविण्यात येते, अनुपस्थित वि‌द्यार्थ्यांच्या पालकांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येते का?

  • शाळा परिसरात कोणतेही पान स्टॉल, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत नसल्याची खात्री केली का? त्याची माहिती पोलिसांना दिली का?

  • शासन निर्देशाप्रमाणे शाळेत तक्रार पेटी बसविली आहे का?

  • शाळेत सखी-सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती आहे का? त्यांची दरमहा बैठक होते का? समितीच्या बैठकीचे इतिवृत्त जतन करून ठेवले का?

  • शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत का? कार्यरत शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली का?

  • मुलींच्या स्वच्छतागृहाजवळ महिला परिचर तर मुलांसाठी स्वच्छतागृहाजवळ एक परिचर नेमला आहे का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : आयुष कोमकर खून प्रकरण; आंदेकर टोळीच्या मारेकऱ्यांची धुळे कारागृहात रवानगी

अमेरिकेवर शटडाऊनचं संकट! पैसे संपले, निधी मंजुरीला मतं पडली कमी; अनेक सरकारी सेवा बंद करण्याची वेळ

Severe Cyclone : कोकणात चक्रि‍वादळाची स्थिती, तीव्रता भयानक; अनेक घरांचे नुकसान

Heart Attack Deaths India: भारतात दररोज 175 लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू , एनसीआरबीच्या अहवालात धक्कादायक माहिती

Latest Marathi News Live Update: दसऱ्यानंतर अमित शहा अहिल्यानगर दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT