mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! ‘जीआर’ न निघाल्याने थांबले पंचनामे! नुकसान भरपाई २ की ३ हेक्टरसाठी, अधिकारी संभ्रमात? नुकसान २९ जिल्ह्यात अन्‌ पंचनामे ३ जिल्ह्यांचेच पूर्ण

मंगळवारी राज्य सरकारने मदतीसाठी बाधित क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत केल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकारी संभ्रमात सापडले असून हेक्टरची मर्यादा वाढविल्यास पुन्हा पंचनामे करावे लागतील म्हणून सध्या पंचनामे थांबविण्यात आले आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील २९ जिल्ह्यांमधील तब्बल ४७ लाख हेक्टरवरील पिके वाया गेल्याचा नजर अंदाज अहवाल कृषी विभागाने शासनाला दिला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरपाई मिळेल म्हणून युद्धपातळीवर पंचनामे सुरू आहेत. मात्र, मंगळवारी राज्य सरकारने मदतीसाठी बाधित क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत केल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकारी संभ्रमात सापडले असून हेक्टरची मर्यादा वाढविल्यास पुन्हा पंचनामे करावे लागतील म्हणून सध्या पंचनामे थांबविण्यात आले आहेत.

सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बीड, धाराशीव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. याशिवाय हिंगोली, वर्धा, नागपूर, अमरावती, बुलडाणा, अकोला अशा २९ जिल्ह्यांनाही मोठा फटका बसला आहे. राज्यातील ७१ लाख शेतकऱ्यांचे या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे.

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले. पंचनामे किती हेक्टरच्या मर्यादेत करायचे, पूर्वीच्या की नव्या शासन निर्णयानुसार पंचनामे करायचे, सरसकट भरपाई मिळणार म्हणजे नेमके काय, या प्रश्नांची उत्तरे त्या शासन निर्णयातून मिळतील असा विश्वास अधिकाऱ्यांना होता. मात्र, शासन निर्णय न निघाल्याने अधिकारीच संभ्रमात सापडले आहेत.

२६ जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल अपूर्णच

बाधितांना नुकसान भरपाई देण्यासाठी अंतिम पंचनामा अहवाल बंधनकारक आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरपाई मिळेल, असे सरकारने सांगितले, पण बुलडाणा, हिंगोली व वर्धा हे जिल्हे वगळता उर्वरित २६ जिल्ह्यांचे अजूनही पंचनामे अहवाल अंतिम झालेले नाहीत. त्यामुळे दिवाळीपूर्वी मदत शक्य नसल्याचे मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी सांगत आहेत.

शासन निर्णयाची प्रतीक्षा

सप्टेंबरमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाले आहे. मागच्या शासन निर्णयाप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे केले जात आहेत. अजून पंचनामे सुरू आहेत, पण नवे निकष (हेक्टरची मर्यादा) काय हे शासन निर्णयानंतर समजतील.

- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

नुकसानीची राज्यातील स्थिती

  • एकूण बाधित जिल्हे

  • २९

  • अंदाजे बाधित शेतकरी

  • ७१.०३ लाख

  • आतापर्यंत बाधित क्षेत्र

  • ४६.१३ लाख हेक्टर

  • नुकसानग्रस्तांना मदतीचे पॅकेज

  • ३१,६२८ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavitaran Strike: वीज कर्मचारी संघटनांचा आजपासून तीन दिवस संप; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मोहम्मद शमी पेटला! वन डे संघात निवड न झाल्यावर अजित आगरकर, गौतम गंभीर यांना दिलं उत्तर; म्हणाला, त्यांना जे..

राज्यघटना आणि दलितांच्या आत्मसन्मानावर हल्ला

Kokan Tourism : दापोलीचा अप्रतिम निसर्गसौंदर्याचा खजिना… कोकणातील या लपलेल्या स्वर्गाला एकदा तरी नक्की भेट द्या!

G ranganathan : विषारी कफ सिरप प्रकरणात मोठी कारवाई; 21 बालकांचे जीव घेणारा सापडला, औषध बनवणाऱ्या कंपनीचा मालक अटकेत

SCROLL FOR NEXT