land will be measured sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! प्रॉपर्टी विक्रीवेळी सातबाऱ्यावरील बोजा ठरेल अडचण; दस्त नोंदणीवेळी लागणार बॅंकेची ‘एनओसी’; आता खरेदी-विक्रीसाठी तालुक्याचे नाही बंधन

सातबारा उताऱ्यावर बॅंकेचा बोजा असताना देखील अनेकजण जमीन, जागा किंवा घराची विक्री करतात. दस्त नोंदणीवेळी मालमत्तेची (प्रॉपर्टी) विक्री करणारा पोकळ बोजा असल्याचे सह दुय्यम निबंधकांना सांगतात. मात्र, आता खरेदीखतावेळी संबंधित बॅंकेची ‘एनओसी’ (नाहरकत प्रमाणपत्र) द्यावी लागणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सातबारा उताऱ्यावर बॅंकेचा बोजा असताना देखील अनेकजण जमीन, जागा किंवा घराची विक्री करतात. दस्त नोंदणीवेळी मालमत्तेची (प्रॉपर्टी) विक्री करणारा पोकळ बोजा असल्याचे सह दुय्यम निबंधकांना सांगतात. मात्र, आता खरेदीखतावेळी संबंधित बॅंकेची ‘एनओसी’ (नाहरकत प्रमाणपत्र) द्यावी लागणार आहे.

बनावट कागदपत्रे तयार करून किंवा सातबारा उताऱ्यावरील व्यक्तीचे बनावट आधारकार्ड तयार करून मालमत्ता हडपण्याचे प्रकार सातत्याने विशेषत: सोलापूर शहरात घडत आहेत. त्यामुळे प्रॉपर्टी धारकांनी किमान एक-दोन महिन्यांतून एकदा सातबारा उतारा काढून घ्यावा, असेही आवाहन अधिकारी करतात. जेणेकरून कोणीही आपली फसवणूक करणार नाही हा त्यामागील हेतू आहे.

दरम्यान, आता राज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार ‘एक जिल्हा एक नोंदणी’ हा उपक्रम राज्यभर राबविला जात आहे. त्याअंतर्गत मालमत्ताधारकासह किंवा खरेदीदारास त्यांच्या सोयीने जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात त्या प्रॉपर्टीची दस्तनोंदणी करता येणार आहे. मालमत्तेची खरेदी करताना घेणाऱ्या व्यक्तीने त्या प्रॉपर्टीचा विधिज्ञांकडून सर्च रिपोर्ट काढावा, जेणेकरून त्या मालमत्तेसंबंधीची संपूर्ण माहिती त्यातून समोर येते. सध्या सोलापूर जिल्ह्यात १७ सह दुय्यम निबंधक कार्यालये असून हा उपक्रम सुरू केल्यापासून दस्तनोंदणीत वाढ झाल्याचे अधिकारी सांगतात. त्यामुळे लोकांचा वेळ, पैशांचीही बचत झाली आहे.

प्रत्येक तालुक्यात करता येईल खरेदीदस्त

राज्य शासनाच्या ‘एक जिल्हा एक नोंदणी’ अभियानाअंतर्गत प्रॉपर्टी खरेदी-विक्री आता जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील सह दुय्यम निबंधक कार्यालयात करता येते. प्रॉपर्टी एका तालुक्यात आणि विक्री करणारा किंवा घेणारा दुसऱ्या तालुक्यातील असेल तर त्यांना त्यांच्या तालुक्यातील कार्यालयात दस्तनोंदणी करता येईल.

- प्रकाश खोमणे, जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी, सोलापूर

...तर बॅंक ती प्रॉपर्टी ताब्यात घेऊ शकते

मालमत्ता (जागा, जमीन किंवा घर) खरेदी करताना सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कात बॅंकेचा किंवा विकास सोसायटीचा बोजा नोंद असेल तर त्याबद्दल खरेदीदाराने खात्री करावी. त्या बोजासह खरेदी करण्याची तयारी असेल तर काही अडचण नाही, पण त्यावेळी संबंधित बॅंकेची ‘एनओसी’ लागेल. खरेदीखतासोबत ती जोडल्यास पुढील अडचणी टळतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बोजा असलेली प्रॉपर्टी कोणीही खरेदी केली तरी थकबाकीपोटी संबंधित बॅंक भविष्यात प्रॉपर्टी ताब्यात घेऊन तिचा लिलाव करू शकते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT