0Exam_20studant_0 - Copy.jpg sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळणार १० मिनिटे जादा; बारावीची मंगळवारपासून परीक्षा; पहिला पेपर इंग्रजी विषयाचा, वाचा...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा उद्यापासून (मंगळवारी) सुरु होत आहे. १० फेब्रुवारीला बारावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर इंग्रजीचा आहे. उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना १० मिनिटे जादा मिळणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा उद्यापासून (मंगळवारी) सुरु होत आहे. १० फेब्रुवारीला बारावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर इंग्रजीचा आहे. उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना १० मिनिटे जादा मिळणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील ५४ हजार ८७५ विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देतील. या परीक्षेसाठी ११९ केंद्रे असणार आहेत. प्रत्येक केंद्रावर व केंद्रातील वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी ४० भरारी पथके असणार आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक देखील राहील. विद्यार्थ्यांना बरोबर साडेदहा वाजण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर यावे लागणार आहे. वर्गात विद्यार्थी सोडताना त्यांची अंगझडती होईल.

सर्वप्रथम विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळतील. बरोबर पेपर सुरु होण्याच्या वेळेत उत्तरपत्रिका वितरित होतील. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका वाटपासाठी १० मिनिटे लागतात म्हणून तेवढा वेळ वाढवून देण्याचा निर्णय बोर्डाने यापूर्वीच घेतला आहे. दरम्यान, कॉपी केस आढळणाऱ्या परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द केली जाणार असल्याचा इशाराही बोर्डाने दिला आहे.

अशा वाजणार बेल...

  • वॉर्निंग गजर : अर्धा तास आधी

  • उत्तरपत्रिका वाटप : १० मिनिटे अगोदर दोन टोल

  • प्रश्नपत्रिका वाटप : बरोबर पेपर सुरु होण्याच्या वेळी दोन टोल

  • एक तास : दोन टोल

  • दोन तास : दोन टोल

  • दहा मिनिटे बाकी : एक टोल

  • लेखन समाप्त : १० मिनिटे जादा झाल्यावर

पर्यवेक्षकांसाठी सूचना...

परीक्षा दालनात ज्या क्रमाने परीक्षार्थींना प्रश्नपत्रिकांचे वाटप होईल, त्याच क्रमाने परीक्षेचा कालावधी संपल्यावर लिखित उत्तरपत्रिका परीक्षार्थ्यांकडून गोळा करायच्या आहेत. तशा सूचना सर्व दालन पर्यवेक्षकांना संबंधित परीरक्षक व केंद्रसंचालकांनी द्याव्यात, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पलटी बहाद्दर! India vs Pakistan लढतीत खेळण्याची तयारी; ICC भीक घातली नाही म्हणून यांनी स्वतःच्या पंतप्रधानांचा शब्द फिरवला

T20 World Cup SA vs CAN: दक्षिण आफ्रिकेचा सफाईदार विजय; कॅनडाच्या नवनीतने दिली कडवी टक्कर! गुणतालिकेत मोठा बदल

Nationwide Workers Strike : देशभरातील तब्बल ३० कोटी कामगार जाणार संपावर! ; ६०० जिल्ह्यांमधील कामं ठप्प होण्याची चिन्हं

Pune News : कोल्हापूरच्या आदेशाने पुण्यातील निवडणूक बिनविरोध

Shendurwada News : शेंदूरवादा गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुसंडी

SCROLL FOR NEXT