Devendra Fadnavis and Rashmi Shukla  
महाराष्ट्र बातम्या

रश्मी शुक्लांना मोठा दिलासा! फोन टॅपिंग प्रकरणी सीबाआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला

Rashmi Shukla Phone Tapping Case: सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला आहे.

रवींद्र देशमुख

Rashmi Shukla Phone Tapping - महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालणारे फोन टॅपिंग प्रकरण आता पूर्णपणे बंद झालं आहे. सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला आहे.

त्यामुळे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०१९ साली महाविकास आघाडीच्या वाटाघाटी सुरू असताना महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब देखील नोंदवण्यात आला होता. सीबीआयने आपल्या तपासात जे आरोप केलेत ते निष्पन्न होत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्याला न्यायालयाने मान्यता दिली आहे. आता हे प्रकरण पूर्णत: बंद होईल.

विरोधीपक्षनेते असताना देवेंद्र फडणवीसांनी मार्च २०२१ मध्ये फोन टॅपिंग संदर्भात गंभीर आरोप केले होते. त्या संदर्भातील सिक्रेट डॉक्युमेंट तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन डीजी सुबोध जयसवाल यांना दिले होते. ते डॉक्युमेंट विरोधी पक्षनेत्यांकडे कसे गेले, याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार फडणवीसांचा जबाब नोंदवला होता.

दरम्यान ठाकरे सरकार कोसळल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेलं होतं. आता सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिल्यामुळे या प्रकरणाचा तपास थांबला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला या दोघांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT