Descriptive examination system should be implemented from 2025 onwards MPSC Student Protest
Descriptive examination system should be implemented from 2025 onwards MPSC Student Protest  Sakal
महाराष्ट्र

MPSC Exam News: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! कोविडच्या काळामुळे झालेली अडचण मुख्यमंत्र्यांनी सोडवली

सकाळ डिजिटल टीम

MPSC Exam News : गेल्या काही दिवसांपासून MPSC चे विद्यार्थी आपल्या विविध मागण्या सरकारपुढे ठेवत होते. त्यांच्या मागण्या सरकारने मान्यही केल्या आहेत. आता या विद्यार्थ्यांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. EWS प्रमाणपत्राची अट आता शिथिल झाली आहे.

कोरोना काळामुळे EWS प्रमाणपत्र न निघाल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली होती. याबद्दल विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. EWS प्रमाणपत्र नसेल तरीही विद्यार्थ्यांना मुलाखतींसाठी संधी देण्याची मुभा आता देण्यात आली आहे.

याबद्दलचा शासननिर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. या निर्णयासाठी स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

यापूर्वी MPSC (Maharashtra Public Service Commission) च्या विद्यार्थ्यांनी दीर्घोत्तरी प्रश्नपत्रिका पॅटर्न २०२३ पासून लागू करण्याला विरोध केला होता. हा पेपर पॅटर्न २०२५ पासून लागू व्हावा, अशा मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलनही केलं होतं. अखेर या आंदोलनाला यश आलं आणि विद्यार्थ्यांची ही मागणीही मान्य झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT