Raj Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: महाराष्ट्रातील राजकीय गोंधळात राज ठाकरेंना मोठा धक्का! 'या' नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

MNS Raj Thackeray News - मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने धक्कादायक घडामोडी घडत आहेत.

रवींद्र देशमुख

Nashik News - मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने धक्कादायक घडामोडी घडत आहेत. अजित पवार भाजपसोबत जाणार ही चर्चा सुरू झाल्याने राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. हे सुरू असतानाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे.

नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. काही वैयक्तीक कारणांमुळे आपण राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या राजीनाम्याचं पत्र त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाठवल आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.

दरम्यान पदाला न्याय देऊ शकत नसल्यामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दिलीप दातीर शिवसेनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेते आले होते. त्यानंतर त्यांची थेट शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आज त्यांनी अचानक शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

नाशिक मनसेसाठी महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. मात्र त्याच नाशिकमध्ये मनसेला धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT