Shahu Chhatrapati Maharaj Maratha Reservation Narendra Modi esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : PM मोदीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, कारण..; शाहू छत्रपती महाराजांचं मोठं विधान

घटना दुरुस्तीशिवाय (Indian Constitution) मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

मराठा समाजाला आरक्षण मिळवून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. पुढच्या निवडणुकीत कोण निवडून येईल, सांगता येत नाही.

कोल्हापूर : ‘महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबद्दल रान पेटले असून, घटना दुरुस्तीशिवाय (Indian Constitution) मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. केंद्र सरकारने मराठा आरक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी केले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नाने राज्यभरात उग्र रूप धारण केले असून, त्यांनी याबाबत प्रसिद्धीमाध्यमांशी नुकताच संवाद साधला. शाहू महाराज म्हणाले, ‘गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारने यावर तातडीने निर्णय घेतला पाहिजे. हा विषय किती आणि कशासाठी ताणवत आहात?

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सर्वांची इच्छा आहे, असे सांगतात. सर्वांची इच्छा आहे तर आरक्षण का दिले जात नाही? शासनाने कितीही ठरवले तर केंद्र सरकारशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने केंद्र सरकारकडे आरक्षणाची मागणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

शाहू महाराज पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातून योग्य तो मार्ग काढावा. आरक्षणासाठी कायद्यात बदल करावा लागेल. सध्या असणारे ५० टक्के आरक्षण ८५ टक्क्यांपर्यंत नेले पाहिजे. यासाठी घटनादुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. कायद्यात बदल करण्याची ताकद केंद्र सरकारकडे आहे. याशिवाय, केंद्रात आणि राज्यात एकच सरकार आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील परिस्थितीचा आढावा पंतप्रधान मोदी यांना दिला पाहिजे.

कारण, मराठा समाजाला आरक्षण मिळवून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. पुढच्या निवडणुकीत कोण निवडून येईल, सांगता येत नाही. आरक्षण ५० टक्क्यांवरून ८५ टक्क्यांवर गेले तर ओबीसी आणि मराठा असा संघर्ष होणार नाही. सध्या दोन्ही समाजात ध्रुवीकरण सुरु आहे, हे लोकशाहीला मारक आहे.’

‘जालनामध्ये लाठीमार का झाला? त्यांना कुणी आदेश दिले? जे चित्र पाहिले, त्यात छातीवर नाही तर पाठीवर लाठी मारली जात होती. म्हणजे आंदोलक पळत जात असताना त्यांच्यावर लाठीमार केला आहे. सरकारने मनोज जरांगे-पाटील यांचा जीव वाचवला पाहिजे. आमरण उपोषण मागे घेतले पाहिजे, कारण जीव महत्वाचा आहे’, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT