Ashish Shelar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashish Shelar: मी आजपासून 'कुरेशी' आहे; आशिष शेलारांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

मला शेलारांनी स्वतःचं केलेलं नामकरण आवडलं, असं खोचक ट्वीट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

भाजपाचे मुंबईतले अध्यक्ष आशिष शेलार यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावरुनच आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच काँग्रेसकडूनही या व्हिडीओवरुन शेलारांवर निशाणा साधण्यात आला आहे. (Ashish Shelar BJP Viral Video)

या व्हिडीओमध्ये आशिष शेलार यांच्या भाषणातला काही भाग दाखवण्यात आला आहे. शेलार आपल्या भाषणात म्हणतायत की, "कुरेशी जर हाजी अराफत सारखा असेल, कुरेशी प्रामाणिकपणे काम करणारा, कोणालाही न घाबरणारा आणि फक्त देवापुढे नतमस्तक होणारा असेल तर आजपासून आशिष शेलारही कुरेशी आहे."

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा व्हिडीओ ट्विट करताना म्हटलं आहे की, मतांसाठी आम्ही जात, धर्म, गोत्रही बदलायला तयार आहेत. शेलारांचे कुरेशी बनायलाही तयार आहेत. शेलार यांच्या भाषणातला हा भाग महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही ट्विट केला आहे. मला आशिष शेलारांचं हे भाषण आणि त्यांनी स्वतःचं केलेलं नामकरण आवडलं. तसंच त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेलाही शेलार यांचं भाषण आणि त्यांनी केलेलं नामकरण आवडलं का, असं विचारलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT