bjp, Shivsena 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : मेगाभरती ते ‘मेगानाराजी’; युतीतील चित्र

संजय मिस्कीन

मुंबई : भाजप-शिवसेना युतीची घोषणा झालेली असली तरी दोन्ही पक्षातील बंडोबांच्या रुद्रावताराने युतीवर मैत्रीपुर्ण लढतीचे सावट ओढावण्याची शक्यता आहे. जे मतदारसंघ भाजपला सुटले तिथे शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर जे मतदारसंघ शिवसेनेला सुटले तिथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. यामुळे बहुतांश मतदारसंघात बंडखोरांनी उमेदवारी दाखल करण्याचा निर्धार केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दमछाक सुरू झाली आहे. 

दरम्यान, युतीमधल्या बंडखोरांच्या धास्तीने भाजप व शिवसेनेनं सर्वच्या सर्व मतदारसंघात एबी फाॅर्मचे पोहचवले असून ऐनवेळी कोणतीही गडबड नको यासाठीची पुर्वतयारी केली आहे. 

या सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी युतीमधे काही जागांवर मैत्रीपुर्ण लढती करण्याची नवी खेळी समोर आणली असून दोन्ही पक्षातील नेत्यामधे यावर मतभेद सुरू झाले आहेत. 

शिवसेनेनं युती करताना पुर्णपणे भाजपच्या शब्दावर विश्वास ठेवला. पण अनेक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. तर शिवसैनिकांनी देखील नाशिक, पुणे व नागपूर सारख्या शहरात बंड करण्याची तयारी सुरू केली आहे. या सर्व परिस्थितीमधे काॅग्रेस व राष्ट्रवादीने या बंडखोरांना बगल देत उमेदवारी यादी जाहिर केल्यामुळे युतीच्या ईच्छुकांमधे कमालीचा संताप सुरू असल्याचे चित्र आहे. 

भाजपने सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात एबी फाॅर्म पाठवले याची माहिती मिळताच शिवसेने देखील सर्व मतदार संघात एबी फाॅर्म रवाना केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT