bjp Ashish Shelar critisize mva govt on rajya sabha election result  
महाराष्ट्र बातम्या

विधानपरिषद गुप्त मतदानाने, तेव्हा काय करणार?, शेलारांचा 'मविआ'ला सवाल

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपासून राज्यसभेच्या निवडणूकीवरून राज्यातील राजकीय वातवारण चांगलेच तापले होते. दरम्यान राज्यसभेचा निकाल लागला असून आता राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत, यादरम्यान भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्यसभेचा निकालानंतर मुद्दे आणि गुद्दे असे म्हणत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. (bjp Ashish Shelar critisize mva govt on rajya sabha election result)

शेलार यांनी ट्वीटरवर एक ट्वीट मालिका पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी शिवसेना-काँग्रेस यांच्यातील अंतर्गत वादावर बोट ठेवलं आहे, ते म्हणाले की, काँग्रेसने शिवसेनेला मदत केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपाकडे 113 मतांचा कोटा असताना 123 मते कशी व कुठून आली? असा प्रश्नही त्यांनी यामध्ये उपस्थित केला आहे. शिवसेनेच्या प्रथम पसंतीचे उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षा भाजपाच्या धनंजय महाडिक यांची मते अधिक असल्याचे ते म्हणाले. पुढे त्यांनी नेत्यांची काळजी आणि शिवसैनिक वाऱ्यावर? असा सवाल शेलारांनी शिवसेनेला केला आहे.

MIM ची मते घेऊन औरंगजेबी युती अखेर केलीच, आता औरंगाबाद नामांतराचे काय? सपाची मते ही चालवून घेतली तेव्हा ह्रदयातला राम कुठे काढून ठेवला? असे म्हणत त्यांनी MIM ला भाजपची बी टीम म्हणणाऱ्यांना प्रतिप्रश्न केला आहे. महाराष्ट्रात संजय पवार हारतो आणि इम्रान प्रतापगढी जिंकतो, हे "प्रताप" महाराष्ट्र बघतोय, असा टोलाही शेलारांनी लगावला.

राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर भाष्य करताना त्यांनी, उघड मतदानात जे चित्र समोर आले त्याने एवढे बावचळलेत..विधानपरिषद निवडणूक गुप्त मतदानाने पार पडणार आहे, तेव्हा काय करणार? असा सवाल त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना केला आहे. अंतर्विरोधाचा तीन तिघाडा किती दिवस झाकणार? भाजप नेत्यांच्या घरातील तथाकथित अनधिकृत बांधकामे शोधण्यापेक्षा सरकारमधील फूट शोधण्याचा किमान समान कार्यक्रम राबवा!, असा सल्ला देखील त्यांनी दिला महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT